कॅरम असोसिएशनच्या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली जाईल : नारायण

पुणे -कॅरम असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त पीवायसी जिमखाना येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना इन्टरनॅशनल कॅरम फेडरेशनचे सेक्रेटरी जनरल व्ही. डी नारायण म्हणाले की, कॅरम असोसिएशन ऑफ पुणेने गत वर्षभरात 3 राज्यस्तरीय 9 जिल्हा स्तरीय शालेय स्पर्धा तसेच सी. एम. चषक सारख्या एकूण 20 स्पर्धांचे आयोजन केले होते. तसेच यावेळी नवीन खेळाडूंसाठी अनेक शिबिर आयोजित केले गेले होते. त्यामुळे पुणे हे कॅरमची पंढरी होण्याचे संकेत असून भविष्यात पुण्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू निर्माण होतील असा विश्‍वासही नारायण यांनी बोलताना व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत देसडला, सेक्रेटरी जनरल व्ही. डी. नारायण आणि अरुण केदार आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या कॅरम या खेळासाठी चांगले दिवस आले असून एवढ्या स्पर्धा होऊन त्यांचा वार्षिक अहवाल सादर करणारी जिल्हा पातळीवरची संघटना असल्याची ख्याती जागतिक पातळीवर पोहोचवणार आहे. तसेच ज्येष्ठ कॅरम खेळाडू किरण तिवारीयांना त्यांच्या कॅरम या खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.