राजधानी दिल्लीत करोनचा कहर ! मोठ्या हॉस्पिटलमधील बेड संपले

नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत करोनाने कहर माजविला आहे. करोनाबाधित रूग्णांच्या संख्येमुळे दिल्लीतील हॉस्पिटल फुल झाले आहेत. देशात करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने सरकारच्या पायाखालची जमीन सरकविली आहे. दररोज लाखो रूग्ण पॉझिटीव्ह आढळून येत आहेत. ही संख्या एवढी वाढली आहे की दिल्लीतील मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये बेड खाली नाहीत. यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारची झोप उडाली आहे.

दिल्ली सरकारच्या करोना ऍपनुसार, दिल्लीत रूग्णांना बेड उपलब्ध होत नाही. मोठमोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड रिक्त नाहीत. तर एक डझनपेक्षा जास्त खासगी रूग्णालयातही बेडची उपलब्धता शून्यावर जावून पोहचली आहे. ओखलातील होली फॅमिली हॉस्पिटलमधील सर्व 164 बेड फुल झाले आहेत. शालीमार बाग येथील मॅक्‍समधील (158), पंजाबी बाग येथील महाराजा अग्रसेनमधील (150), रोहिणीतील जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये (124), द्वारकातील वेंकटेश्वरमधील (98), रोहिणीतील सरोज हॉस्पिटल (84), बीएल कपूर (81), विम्हांस हॉस्पिटल (66), आयुष्मान (65), कालरा हॉस्पिटल (65), गोयल हॉस्पिटल (60), मलिक रेडिक्‍स हॉस्पिटल (46), नॅशनल हार्ट इंस्टिट्यूट (46), हार्ट अँड लंग (43), द्वारकातील महाराजा अग्रसेन (32), रिवाईव हॉस्पिटल (28) आणि भगतचंद्र हॉस्पिटल (23) सर्व बेड फुल आहेत.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्थिती लक्षात घेता आढावा बैठक घेतली. यानंतर सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या वाढविण्यात येईल, असे आश्वसन त्यांनी दिले. तर, काही हॉस्पिटल पूर्णपणे कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात येईल. दरम्यान, नागरिकांनी करोना नियमाचे पालन करावे, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.