नवी दिल्ली – देशभरात कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी देशाला संबोधन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. दरम्यान, मोदींच्या या संबोधनाने टिव्हीवरील प्रसारित मागील सर्व संबोधनांचे विक्रम मोडले आहे. बार्क इंडिया रेटिंग्सने या संदर्भातील माहिती सोशल मीडियावर दिली आहे.
टिव्ही रेटिंग एंजेसी बार्क इंडियानुसार, मोदींच्या गेल्या काही भाषणांचा सुद्धा आढावा घेण्यात आला आहे. 24 मार्चला लॉकडाऊनच्या पंतप्रधान मोदींच्या भाषणाला टिव्हीवर सर्वाधिक पाहण्यात आले.
According to data shared by @BARCIndia the speech by PM @narendramodi on Total Lockdown on 24th March had highest TV viewership (unique viewers greater than IPL Finals) with more than 201 channels carrying it.
— Shashi Shekhar (@shashidigital) March 27, 2020
याने आयपीएलच्या फायनल मॅच पाहणाऱ्या संख्येला देखील मागे टाकले आहे. हे संबोधन 201 पेक्षा अधिक चॅनेलवर दाखवण्यात आले आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्याला 13.3 कोटी लोकांनी पाहिले होते. तर मोदींच्या संबोधनाला 19.7 कोटी लोकांनी पाहिले.
तसेच, मोदींच्या जनता कर्फ्यूच्या संबोधनाला 191 टिव्ही चॅनेलवर 8.30 कोटी लोकांनी पाहिले. तर नोटबंदीच्या संबोधनाला 114 चॅनेलवर 5.7 कोटी लोकांनी पाहिले होते. त्यामुळे मोदींच्या या संबोधनाने मागील सर्व भाषणांचे विक्रम मोडल्याचे चित्र दिसून येत आहे.