मुंबई – भारतामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे.
दरम्यान, या अशा परिस्थिती पोलिस आणि डॉक्टर हे दिवसातील कित्येत तास काम करत आहेत. काम करताना कोरोनाची लागण देखील होऊ शकते याची त्यांना चांगली कल्पना असली, तरी ते आपले काम खूपच चांगल्याप्रकारे करताना दिसत आहे. दरम्यान, त्यांच्या या कामासाठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांचे आभार मानले आहेत.
DISGUSTED & ANGRY to read reports of “educated” persons attacking doctors in their neighbourhood on baseless assumptions. Such insensitive people are the worst criminals😡#StaySafeStayHome #IndiaFightsCorona
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 12, 2020
तर दुसरीकडे अशा स्थितीत देखील काही लोक या ‘देवदूतांना’ मारहाण करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर बॉलिवूडचा सिंघम अभिनेता ‘अजय देवगण’ चांगलाच भडकला आहे.
अजय देवगणने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत एक ट्वीट पोस्ट केलं आहे. त्यात अजय देवगण म्हणतो, ‘अशा बातम्या पाहून मी निराश झालो आहे… मला खूप राग येतो आहे. शिकलेले लोक निराधार अंदाज लावत जर डॉक्टरांवर हल्ले करत असतील, तर ते लोक असंवेदनशील आहेत. असे लोक सर्वात वाईट गुन्हेगार आहेत.’ असं अजय म्हणतो.