मुंबई – सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पसरला आहे. त्यामुळे देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले आहे. दरम्यान, याच पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधीत करताना येत्या 5 एप्रिलला रात्री 9 वाजून 9 मिनिटांसाठी मेणबत्ती, मोबाईल फ्लॅश लाईट लावून सामुदायिक योगदानातील आपली कटिबद्धता व्यक्त करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
दरम्यान, या दिवे लावण्याच्या मोहिमेत सर्वसामान्यापासून हिंदी आणि मराठी सेलिब्रेटीपर्यंत सगळ्यांनी आपला सहभाग मोठा नोंदवला. सोशल मीडियावर त्यांनी आपले फोटो शेअर केले आहेत.