मेलबर्न : जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल टेनिसपटू कॅरोलिन वोज्नियाकीने आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत तिस-या फेरीत मिळालेल्या पराभवानंतर भावनिक होत टेनिसविश्वाला अलविदा केले आहे. आपल्या कारकिर्दीतील ही अखेरची स्पर्धा असेल, असे कॅरोलिनने डिसेंबरमध्येच स्पष्ट केले होते.
The end of an era.
Thank you for the memories @CaroWozniacki. You'll be so very missed💕#AO2020 | #AusOpen pic.twitter.com/z37ZwjMR81
— #AusOpen (@AustralianOpen) January 24, 2020
आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या तिस-या फेरीतील सामन्यात शुक्रवारी ट्युनिशियाच्या आॅस जाबुर हिने कॅरोलिन हिचा ५-७, ६-३, ५-७ असा पराभव केला.
Ons Jabeur is the 1st Arab woman to make the Round of 16 at a Slam.
The Tunisian defeats Caroline Wozniacki in the final match of the Dane’s career, wins 75 36 75 to advance to the fourth round. #AusOpen
— WTA Insider (@WTA_insider) January 24, 2020
सामना संपल्यानंतर कॅरेलिनला अश्रू अनावर झाले होते. ३० डब्ल्यूटीए विजेतेपद पटकावलेल्या कॅरोलिनने २०१८ साली आॅस्ट्रेलियन ओपन हे एकमेव ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे.