असा उभा करणार निधी
मुंबईच्या धर्तीवर पुणे पालिकेच्या पाच परिमंडळांच्या स्तरावर डॉग पॉंड उभारली जाणार आहेत. तेथे भटक्या कुत्र्यांना आणून त्यांचे लसीकरण केले जाणार आहे. ही कुत्री पकडण्यासाठी अशासकीय संस्थांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही प्रशासनाने सुरू केली आहे. मात्र, या संस्थाच मोकाट कुत्री पकडण्यासाठी वाहन देणार असल्याने महापालिकेने या वाहन खरेदीसाठी अंदाजपत्रकात सुमारे सव्वा कोटी रुपयांची तरतूद केली होती. ती आता भटक्या मांजरासाठी खर्ची पडणार आहे.
पुणे – शहरातील भटक्या कुत्र्यांसोबतच, भटक्या मांजराचेही लसीकरण महापालिकेकडून केले जाणार आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारीतील भारतीय जीवजंतू कल्याण मंडळाकडून याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ही कारवाई करून महिनाभरात त्याचा अहवाल सादर करण्याच्या राज्य नगरविकास विभागाने सूचना महापालिकेस दिल्या आहेत.
दरम्यान, या लसीकरण मोहिमेसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे निधी नसल्याने, प्रशासनाने वर्गीकरणाद्वारे हा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवला आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील भटक्या मांजरांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी त्यांचे लसीकरण तसेच त्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी ऍनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने सूचना केल्या आहेत. त्यानुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान, आतापर्यंत भटक्या कुत्री, गायी तसेच मोकाट डुकरांवराच कारवाई केली जात होती. त्यामुळे मांजरांबाबत व्यवस्था नाही, तसेच लसीकरणासाठी तरतूदही नाही. त्यामुळे वर्गीकरणाचा प्रस्ताव ठेवला आहे.