सावधान…! राष्ट्रपती-पंतप्रधानांच्या छायाचित्रांचा गैरवापर कराल तर…

नवी दिल्ली : देशात आजपर्यंत पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यासारख्या पदावरील व्यक्‍तींच्या छायाचित्रांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र आता अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. कारण यापुढे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या छायाचित्रांचा गैरवापर करण्यात आला तर अशा व्यक्‍तींना तुरूंगाची हवा खावी लागणार आहे. केंद्र सरकारकडून प्रतिक आणि नाव या कायद्याअंतर्गत आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा लागू होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या कायद्याचा मसूदा तयार करण्यात आला असून हा मसूदा कायदा मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. जर या मसूद्यावर संमती देण्यात आली तर या कायद्या अंतर्गत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या छायाचित्रांचा गैरवापर करण्यात आला तर अशा व्यक्‍तींना सहा महिन्यांचा तुरूंगवास आणि 5 लाखांची दंड भरावा लागणार आहे.

खरं तर, अलीकडच्या काळात जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छायाचित्रांचा वापर करण्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी पंतप्रधानांच्या छायाचित्रांचा जाहिरातींमध्ये गैरवापर करणाऱ्या देशातील दोन मोठ्या कंपन्यांवर सरकारने कारवाई केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.