सांभाळा यकृताचे आरोग्य (भाग-३)

डॉ. अमित गुप्ते 
दरवर्षी 28 जुलै हा दिवस वर्ल्ड हिपॅटिटीस डे म्हणून जगभर साजरा केला जातो. आजच्या बदलत्या काळात समाजात व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत असताना आणि जास्तीतजास्त युवा पिढी विविध व्यसनांच्या आहारी जात असल्याचे दिसत असताना, यकृत विकारांविषयी समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे. 
मधुमेहामुळे यकृताच्या कर्करोगाचा धोका 
मधुमेहामुळे यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढतो, असे संशोधन शास्त्रज्ञांनी केले आहे. मधुमेह हा आजार आयुष्यभराची साथ करणारा आहे. हा आजार झाल्यास तो बरा होत नाही. त्याला नियंत्रणात ठेवावे लागते. त्यामुळे औषधांबरोबरच नियमित पथ्य केल्यावरच तो नियंत्रणात राहू शकतो. या मधुमेहामुळे अन्य आजार होण्याची शक्‍यता वाढते. मधुमेहामुळे यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढतो, असे संशोधन शास्त्रज्ञांनी केले आहे. या नवीन आजाराचे नामकरण शास्त्रज्ञांनी हेप्टोसेल्यूलर कार्सिनोमाफ असे केले आहे.
पन्शेत्मधुमेह नसणा-या व्यक्तींपेक्षा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये यकृताचा कर्करोग होण्याचे प्रमाण तिप्पट असते. लठ्ठपणा आणि मधुमेह प्रतिबंधक उपाययोजना कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेने प्रयत्न करायला हवेत, असे दक्षिण कॅलिफोर्नियातील केक स्कूल ऑफ मेडिसीनचे सहाय्यक प्राध्यापक व्ही. वेंडी सेटियावन यांनी सांगितले.
काही विशिष्ट वंशांच्या गटांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक वाढलेले दिसले. मधुमेहाची काळजी न घेणाऱ्या व्यक्तींमध्ये यकृताच्या कर्करोगाचे प्रमाण वाढलेले आढळले. 1993 ते 1996 दरम्यान मधुमेह झालेल्या एक लाख 50 हजार व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीचे विश्‍लेषण करण्यात आले. यात यकृताचा कर्करोग झालेले 506 जण आढळले.

यकृत आणि आयुर्वेद 

हल्लीच जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्ल्यूएचओ)एक अहवाल जाहीर झाला. या अहवालानुसार दीर्घकालीन यकृत आजारांमुळे एकटया भारतात दरवर्षी दोन लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडतात. अशा वेळी यकृताची काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं.
शरीरातील जवळ-जवळ सर्व क्रियांवरती लक्ष ठेवण्याची महत्त्वाची भूमिका निभावणारा यकृत हा एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. तो खनिजं, जीवनसत्त्वं साठवून ठेवतो आणि शरीरातील 80 टक्के चांगल्याफ कोलॅस्टेरॉलची निर्मिती करतो. यकृतामध्ये पित्तफ या घटकाची निर्मिती होते. पित्तामुळे शरीरातील मेदाचं पचन होतं. यकृतामुळे शरीरातील रक्‍त साकळण्याची क्षमताही वाढते. त्यामुळे रक्‍ताची गुठळी होण्यास मदत होते. या क्रियेचा फायदा शरीराला इजा झाली असता रक्ताचा अतिप्रवाह थांबतो. यावरून यकृताला किती जपलं पाहिजे, हे लक्षात येतं.

काळजी कशी घ्यावी? 

यकृताचं आरोग्य सुधारण्याचे योग्य पर्याय म्हणजे समतोल आहार, नियमित व्यायाम. हल्ली यकृताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी लसीही दिल्या जातात. या लसींमुळे कावीळ या आजाराचा धोका कमी होतो. यकृताची काळजी घेण्यासाठी पुढील उपाय करावेत.
भरपूर दारू पिणाऱ्यांच्या यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशांना अल्कोहोलिक हेपॅटिटिस, मेदयुक्‍त यकृत आणि अल्कोहोलिक सिरॉसिस (यकृत काठीण्य) हे आजार जडू शकतात. नियमित दारू पिणाऱ्यांनी व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन दारू सोडावी.
अंमली पदार्थामुळेही यकृत पेशींचं आरोग्य धोक्‍यात येतं. अमली पदार्थाचं सेवन करणा-याची सवय असणाऱ्यांनी व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन सोडवणूक करावी.
डॉक्‍टरांद्वारे दिली गेलेली काही औषधंसुद्धा यकृतासाठी घातक असू शकतात. त्यामुळे डॉक्‍टरांनी सल्ला दिल्याशिवाय शिफारीत डोसापेक्षा अधिक औषध घेऊ नका.
रंगांच्या थिनरपासून निघणारा विषारी धूर, ढेकूण मारण्याची औषधं आणि तत्सम फवारे फुप्फुसातील अत्यंत छोटया रक्‍तवाहिन्यांमधून शरीरात शिरकाव करू शकतात. यकृतापर्यंत जाऊन तिला इजा करू शकतात. तेव्हा अशी उत्पादने वापरण्याआधी संरक्षणात्मक मुखवटा (मास्क) वापरावा.
एफ, बीफ, सीफ, डीफ आणि ईफ या काविळीच्या (हेपिटायटीस) विविध प्रकारांमुळे यकृताला सूज येते. यकृताच्या नेहमीच्या कार्यावर विपरित परिणाम होतो. सततच्या काविळीमुळे यकृतावर जखमा होऊन त्याची परिणीती यकृताच्या कर्करोगात होते.
 
वनौषधी आणि यकृताचं आरोग्य 
नैसर्गिक आहारामुळे यकृताचं एकंदरीत स्वास्थ्य चांगलं राहातं. रोजच्या आहारात लसूण, लिंबू, हळदीचा समावेश असावा. जसं की, लसणीमुळे यकृतातील एन्झाइम (विकरं) प्रेरित होतात. ही एन्झाइम शरीरातील टॉक्‍सिन (विषद्रव्यं) काढून बाहेर टाकण्यास मदत होते. सकाळी लिबांचा ताजा रस प्यायल्याने यकृताला चालना मिळते, तर हळदीतील क्‍युमीन हा रासायनिक घटक कर्करोगासाठी घातक घटकांचा शरीरातून नाश करतो. यकृताचे शुद्धीकरण वाढतं.
या व्यतिरिक्त, काही कमी माहीत असलेल्या वनऔषधींमध्ये यकृताचं रक्षण करणारे गुण असल्याचे संशोधनात आढळून आलं आहे.
चिकोरी (कासनी): ही वनस्पती भारताच्या उत्तर आणि दक्षिणेकडील जंगली भागात वाढते. सक्षम विषद्रव्यं निष्कृतीकारक आहे. या वनस्पतीमुळे पित्त निर्मितीसुद्धा वाढते
काबरा (हिम्सरा) : पी-मेथॉक्‍सी बेंझोइक ऍसिडचं प्रमाण काबरा या वनस्पतीत असतं. या वनस्पतीमुळे यकृताची कार्यक्षमता वाढते.
कांगणी (काकामाची) : हे रासायनिक द्रव्यांमुळे इजा पोहोचलेल्या यकृताच्या उपचारासाठी फायदेशीर आहे.
अर्जुन : या झाडाच्या सालीचा उपयोग यकृताच्या आरोग्यासाठी होतो. यकृतासाठी ही साले प्रतिऑक्‍सिडीकारक म्हणून गुणकारी ठरते. विषद्रव्यांपासून यकृताचं संरक्षण करण्याचा गुणधर्म या सालीत आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सांभाळा यकृताचे आरोग्य (भाग-१)

सांभाळा यकृताचे आरोग्य (भाग-२)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)