“प्रदर्शनीय’ करिअरवाट

– सतीश जाधव

अलीकडच्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्या आपली उत्पादने बाजारात आणणे, विक्री करणे आदींपासून प्रचार-प्रसारापर्यंतची कामे करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यांमध्ये प्रदर्शनाचे आयोजन करतात. या प्रदर्शनांच्या आयोजनाची कला म्हणजे एक्‍झिबिशन मॅनेजमेंट, एक्‍झिबिशन डिझाइन कम्युनिकेशन, इंजिनिअर आणि इंडस्ट्रियल डिझाइन यांचे समिश्रण आहे. उत्पादनाचे प्रदर्शन आणि विपणन यांची रणनिती बनवणे हेच एक्‍झिबिशन मॅनेजरचे प्रमुख काम असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सौंदर्य प्रसाधनांचे स्टॉल लावण्यापासून अस्त्र शस्त्र, विमाने यांच्या प्रदर्शनाच्या वेळेची निवड करणे, प्रचार-प्रसार कंपन्यांना आमंत्रित करणे, माध्मांना बातम्या देणे इत्यादी व्यवस्था करणे हीदेखील एक्‍झिबिशन मॅनेजरची जबाबदारी असते. भारतात अद्याप तरी एक्‍झिबिशन मॅनेजमेंटशी संबंधित एखादा वेगळा अभ्यासक्रम राबविला जात नाही. प्रदर्शन कलेच्या या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश अधिक आहे.

अभ्यासक्रम सुरू न होण्याचे कारण म्हणजे प्रदर्शन कला ही आपल्याकडे गृहव्यस्था, गृहविज्ञान यामध्ये एका विषयाच्या रुपात शिकवले जाते. प्रदर्शन कलेमध्ये स्वतंत्र अभ्यासाची सुविधा देशातील केवळ नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन, पालडी, अहमदाबाद येथे असून त्याच्या शाखा एनआयडी कोर 6, तिसरा मजला, इंडिया हॅबिटेड सेंटर, लोधी रोड, नवी दिल्ली. तसेच एनआयडीबी, 112, राजीव नगर इंडस्ट्रियल, बंगळुरू येथे उपलब्ध आहेत. येथे एक्‍झिबिशन डिझाइनमध्ये चार वर्षाचा ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम इन डिझाइन उपलब्ध आहे. येथे प्रवेश घेण्यासाठी गृहविज्ञान, गृहव्यवस्था किंवा इंटेरिअर डेकोरेशनमधील डिप्लोमा करणे गरजेचे आहे.

प्रमुख संस्था :

  • हैद्राबाद इन्स्टिट्युट ऑफ डिझाइन, ए-7, बंजारा गार्डन अपार्टमेंट, बंजारा हिल्स, रोड नं. 12, हैद्राबाद.
  • एपीजी इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन, 54, तघलकाबाद, इन्स्टिट्युशनल एरीया, एमबी रोड, नवी दिल्ली.
  • जे. जे. स्कुल ऑफ आर्टस, मुंबई.
  • इन्स्टिट्युट ऑफ डिझाइनिंग, अहमदाबाद
  • बीडी सोमानी इन्स्टिट्युट ऑफ आटर्स, फॅशन ऍण्ड टेक्‍नॉलॉजी, मुंबई.
  • काही प्रमुख महाविद्यालये जेथे गृहविज्ञानामध्ये प्रदर्शन कला एक विषय म्हणून शिकविली जाते.
  • महिला डिग्री कॉलेज, लखनौ, आयटी कॉलेज लखनौ अलाहाबाद विद्यापीठ.
  • चौधरी चरणसिंह मेरठ विद्यापीठ, मेरठ.
  •  लेडी इरविन कॉलेज, नवी दिल्ली.
  • राजस्थान विद्यापीठ, जयपूर.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)