निगा डोळ्यांची (भाग 2)

नेत्रपेढीचे कार्य

व्यक्तीच्या मृत्यूनंतर नेत्रदान करावयाच्या कालावधीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा उत्तम कालावधी कोणता – तर नेत्रदान मृत्यूनंतर जेवढे लवकर होईल तेवढे उत्तम. साधारणत: मृत्यूनंतर दोन ते चार तासांचे आत शरीराबाहेर काढलेले डोळे नेत्रपेढीत संचय करून ठेवल्यास ते उत्तम राहतात. नेत्रसंचयासाठी 4 अंश से. असे तापमान असावे. निर्जंतुक केलेल्या विशिष्ट बाटल्यांतून ते ठेवावेत. असे डोळे 24 तासांच्या आत कलम करण्यासाठी वापरल्यास शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण वाढते. काही तज्ज्ञ 48 तास थांबले तरी चालते असे मानतात. हा काळ कितीही विवाद्य असला तरी संचय केलेले बुबुळ एक आठवड्याच्या आत वापरलेले बरे हे नक्कीच. नेत्रसंचयाच्या बाबतीत काही मुभा असली तरी नेत्रदानाच्या बाबतीत विशिष्ट काळाचे बंधन पाळायलाच हवे.

डोळ्यांचे रंग

आपल्या डोळ्यांना विविध रंगछटा असतात. तपकिरी, पिंगट, काळा, निळसर, घारा इ. पाश्‍चात्त्य लोकांच्या किंवा विशिष्ट वंशाच्या लोकांच्या डोळ्यांचा रंग बहुतांशी घारा किंवा निळसर असतो. हे रंग बुबुळाच्या पाठीमागे असलेल्या विविधरंगी कृष्णमंडलामुळे असतात. कृृृृृष्णमंडलात विशिष्ट रंगाचे रंगद्रव्य कमी प्रमाणात असते. त्यानुसार या रंगछटा निर्माण होतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही प्रसंगी डोळ्यांचे दर्शनी बाह्यपटल रंगाने पिवळसर झाक धारण करते. रक्‍तात काही कारणाने पित्तरस जास्त प्रमाणात जमा झाला तर तो केशवहिन्यांपर्यंत पोहोचतो. पित्तरसात पिवळ्या रंगाची रंगद्रव्ये असतात. यालाच आपण कावीळ झाली असे म्हणतो. यकृताला काही कारणाने सूज आल्यास अतिरिक्‍त प्रमाणात पित्तरस तयार होऊन तो रक्‍तात मिसळतो. डोळे फिकट वा गडद पिवळे पडू शकतात. काही रुग्णांना रक्‍तक्षय असतो. अशा रुग्णांचे डोळे निस्तेज, पांढुरके, फिके दिसतात.

नेहमीची त्वचेची गुलाबी, तजेलदार झाक आढळत नाही. रक्‍तात नेहमी असणारे हिमोग्लोबिन नावाचे रंगद्रव्य काही कारणाने कमी झाल्यास त्वचा फिकट दिसते. पोटाच्या आजारात अतिसार होऊन शरीरातील पाणी व क्षार कमी झाल्यास डोळे खोल जातात, निस्तेज दिसतात. डोळ्याला जखम व इजा झाल्यास, विशेषत: टणक व टोकदार वस्तूमुळे बाह्यपटलात रक्‍तस्त्राव होतो.

प्रसंगी बुुबुळाभोवती सर्व भाग रक्‍ताळलेला आढळतो. यामुळे डोळा लाल दिसतो. नेत्रत्वचेला सूज येते. या सर्व अवस्थांत डोळ्यांचा रंग कमी जास्त प्रमाणात बदलतो. या सर्व प्रसंगी आपण नेत्रविशारदाचा सल्ला घेऊन, उपाययोजना समजावून घ्यायला हवी. शिवाय दृष्टीविषयक काही समस्या आहे काय, याचीही शहानिशा करावी. प्रसंगी कृत्रिमरीत्या डोळ्यांचा रंग संपर्क भिंगाचा वापर करून बदलतात. विशेषत: नट-नट्या चित्रपटातले प्रसंग साजरे करण्यासाठी या भिंगाचा वापर करतात.

निगा डोळ्यांची (भाग 1)   निगा डोळ्यांची (भाग 3)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)