नवी दिल्ली – पुणेस्थित मर्सिडिज-बेंझ या कार कंपनीने विक्रीचे नवे मॉडेल अंमलात आणले आहे. आता ही कंपनी आपल्या कार थेट ग्राहकांना विकणार आहे.
या उपक्रमाला कंपनीने रिटेल ऑफ द फ्युचर असे नाव दिले असून ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी सुरु होईल. याचा अर्थ डीलरशिवाय कंपनीत थेट ग्राहकांना कारचा पुरवठा करेल. त्यासाठी ऑनलाईन मॉडेल वापरले जाईल. सध्या ऑनलाईन पद्धतीने कंपनीच्या 15 ते 20 टक्के कार विकल्या जातात.
या संदर्भात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मार्टिन श्वेन्क यांनी सांगितले की यामुळे ग्राहकांना कंपनीच्या कार योग्य किमतीमध्ये मिळण्यास मदत होईल. कंपनीचे वितरक आता येथून पुढे फ्रॅंचाईजी पार्टनर म्हणून काम करतील.
याचा अर्थ वितरकाकडील कारची मालकी कंपनीकडे राहील. विक्री केल्यानंतर कारचे इन्व्हाईस कंपनी थेट ग्राहकांना देईल. यामुळे कारच्या किमतीमध्ये एक सलगता येईल असे त्यांनी सांगितले.