पुणे : भरधाव वेगाने निघालेली ब्रिजा कार खराडी बायपास येथील बीआरटी बस थांब्याला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी रात्री साडे बाराच्या सुमारास झाला.
वाघोली च्या दिशेने भरधाव निघालेली ही कार बीआरटी थांब्याला एवढ्या जोरात धडकली की, कारच्या पुढच्या बाजूचा चुराडा झाला आहे. कारमध्ये चौघेजण होते. त्यापैकी कार चालक संकेत रामचंद्र भुजबळ (वय २२, रा. साइनगरी, चंदननगर) व ओम राहुल पवळे वय १७, रा. किनारा हौसिंग सोसायटी, कसबा पेठ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. गौरव संजय साठे (वय 22, संभाजी नगर, वाघोली) व प्रफुल्ल अंकमंची (वय २१, रा. बिडी कामगार नगर चंदननगर, खराडी.) हे दोघे जखमी आहेत.