भीषण : नगर-औरंगाबाद महामार्गावर बस-कार अपघातात पाच ठार

नेवासा तालुक्‍यातील देवगड फाट्याजवळ आज पहाटेची घटना

नेवासा – अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्‍यात देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी आराम बसच्या अपघातात पाच जण ठार झाले. हा अपघात आज पहाटे दोनच्या सुमारास झाला. कारमधील सर्व मृत जालना जिल्ह्यातील आहेत. चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

यातील स्वीफ्ट कार (क्रमांक एमएच 21 बीएफ 7178) औरंगाबादहून नगरकडे येत होती. देवगड फाट्याजवळ नगरकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसशी (एमएच 19 वाय 7123) तिची धडक झाली. या थरकाप उडवणाऱ्या अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले. अपघातात कार बसच्या समोरील बाजूने घुसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वाहतूक तुरळक होती.

अपघाताची माहिती समजताच नेवासा पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. जखमींना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र गंभीर जखमी झालेले कारमधील सर्व पाचही जणांचा उपचारापूर्वीच मरन पावले. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

रस्त्यात पडलेली वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट झालेले नाही. तसेच बसमधील कोणालाही दुखापत झालेली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.