बैरूत – तुर्कस्तानातील कार बॉंबस्फोटात तेरा जण ठार झाले असून अन्य अनेक जण जखमी झाले आहेत. त्या देशातील अझाज गावात ही घटना घडली. तेथील मायताम मशिदीत प्रार्थना करून एक जमाव बाहेर पडत असताना. त्यावेळी गर्दीत कार घुसवून हा स्फोट घडवण्यात आला.
त्यात जे ठार झाले त्यात किमान चार मुलांचा व काही महिलांचाही समावेश आहे. सध्या मुस्लिमांचा पवित्र रमझानचा महिना सुरू आहे. नमाजानंतर तेथे इफ्तार चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला लक्ष्य करण्यासाठी हा स्फोट करण्यात आला.
हा भाग पुर्वी तुर्की सरकारच्या विरोधात लढणाऱ्या कुर्दीश गनिमांच्या ताब्यात होता. पण अलिकडेच तुकीच्या फौजांनी त्या गावावर पुन्हा नियंत्रण प्रस्थापित केले होते. मात्र तरीही अजून या भागात कुर्दीश गनिमांच्या हिंसक कारवाया सुरूच आहेत.