कारचा टायर फुटल्याने अपघातात तीन जण ठार

मळद येथील घटना; दोन महिला जखमी

रावणगाव – मळद (ता.दौंड) गावाजवळ पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात होऊन तीन जण जागीच ठार झाले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुण्यावरून सोलापूर दिशेने जाणाऱ्या मारुती इरटीगा (एमएच 12 एनपी 0613) गाडीचा टायर फुटला त्यामुळे ही गाडी दुभाजक ओलांडून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीवर जावून आदळली.

कार वेगात असल्याने महामार्गा सोडून ती सेवा रस्त्यालगत असलेल्या शेताजवळ जावून थांबली. या भिषण अपघातात दुचाकीवरील दादा आप्पा शिंदे (वय 40) व मोहम्मद हुसेन शेख (वय 45, रा.शिंपोरा ,मानेवस्ती,ता.कर्जत, जि. अहमदनगर) या दोघांचा आणि कार चालक जगदीश गौरीलाल अग्रवाल (वय 68, रा.काश्‍मिरी कॉलनी, येरवडा) यांचा दुर्दैवी अंत झाला.

कारमधील दोन महिला जखमी झाल्या आहेत.हा अपघात इतका भीषण होता की आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी तेथे धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच दौंड व
कुरकुंभ पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.