T20 World Cup 2024 (Super 8, IND vs AFG Playing XI Update) : टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेत आज टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. भारतीय संघाचा सुपर-8मधला हा पहिलाच सामना आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा सामना केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 7.30 वाजता होईल, तर सामना रात्री 8 वाजता सुरू होईल.
अफगाणिस्तानपाठोपाठ टीम इंडियाला सुपर-8 मध्ये बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. अशा स्थितीत रोहित सेनेला सुपर-8 ची सुरुवात विजयाने करायची आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार रोहित शर्मानं अफगाणिस्तानविरूध्द टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. (India won the toss and elected to Bat) त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरेल.
या सामन्यासाठी भारताने आपल्या प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. संघाने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या जागी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा संघात समावेश केला आहे. अफगाणिस्ताननेही संघात बदल केला आहे. करीम जनत या सामन्यात खेळत नसून त्याच्या जागी हजरतुल्लाह जजईचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
🚨 We are Bowling First! 🚨
India won the toss and opted to bat first. 👍#AfghanAtalan | #T20WorldCup | #AFGvIND | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/x1sY3boof6
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) June 20, 2024
IND vs AFG : दोन्ही संघाचे प्लेइंग-11 खालीलप्रमाणे…
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.
अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला जद्रान, हजरतुल्ला झाझाई, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन उल हक, फजलहक फारुकी.
दरम्यान, अफगाणिस्तानने या विश्वचषकात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया अफगाण संघाला अजिबात हलके घेण्याची चूक करणार नाही. तसे, अफगाणिस्तानकडेही अनेक सामने जिंकणारे खेळाडू आहेत, जे उलटफेर करण्यात पटाईत आहेत. टीम इंडियाने टी-20 विश्वकरंडकात साखळी फेरीत सलग 3 सामने जिंकत सुपर-८ फेरीत प्रवेश मिळविलेला आहे. तर कॅनडा विरुद्धचा साखळी फेरीतील चौथा सामना हा पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे, अजिंक्य भारतासमोर आव्हान उभे करणे अफगाण संघासाठी नक्कीच सोपं नसणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 8 टी 20 सामने झाले आहेत. भारताने या 8 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 1 सामना हा अनिर्णित राहिला आहे. याचाच अर्थ टीम इंडिया अफगाणिस्तानवर कायमच वरचढ राहिली आहे. अफगाणिस्तानला टीम इंडिया विरुद्ध अद्याप जिंकता आलेले नसले तरी त्यांनी यंदा साखळी फेरीत दमदार कामगिरी करत सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला आहे.