मुंबई – चेन्नई सुपर किंग्जचा नवनियुक्त कर्णधार रवींद्र जडेजा याचे कर्णधारपद काढून घेतले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. महेंद्रसिंह धोनीने यंदाच्या मोसमाला प्रारंभ होण्यापूर्वीच नेतृत्व सोडले व जडेजाकडे ही जबाबदारी सोपवली होती. मात्र, यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत चेन्नईने आपले दोन्ही सामने गमावले आहेत.
तसेच पुढील सामन्यांत किमान तीन पराभव झाले तर यंदाच्या स्पर्धेत चेन्नईचे आव्हानही संपूष्टात येण्याचा धोका आहे. सध्या जडेजा कर्णधार म्हणून यशस्वी होत नसला तरीही एक अष्टपैलु म्हणून यश मिळवत आहे. आता चेन्नई संघ व्यवस्थापन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचा संघ आतापर्यंत आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये चांगली कामगिरी नाही करू शकला. चेन्नई (CSK) दोनपैकी दोन्ही सामने हरला आहे. चेन्नई सुपर किंग्स सुरुवातीलाच कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत झाला होता. कोलकाता नाइट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सला सहा विकेट राखून सहज पराभूत केलं होतं. त्यानंतर गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनंही (Lucknow Super Giants) चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) 6 विकेट्सनं पराभव केला.