खरेदी केलेले ‘डस्टबीन’ अजूनही धूळ खात

आरोग्याशी खेळ : कॅन्टोनमेंट बोर्डाचा कारभार

पुणे – नागरिकांच्या कररूपी पैशांतून कॅन्टोनमेंट बोर्डाने कचरा डब्यांची खरेदी केली आहे. मात्र, गेली अनेक महिने हे डबे बोर्डाच्या भांडार घरात धूळ खात पडले आहेत. हा नागरिकांच्या पैशांचा अपव्यय असून, बोर्ड प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी, पर्यावरणाशी कशाप्रकारे खेळत आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॅन्टोनमेंट परिसरात स्वच्छता राखण्याची मुख्य जबाबदारी ही बोर्ड प्रशासनाची आहे. घरांतून निघणाऱ्या कचऱ्याचे योग्य वर्गिकरण झाल्यास त्यावर प्रक्रिया करणे सोपे जाते. याची सवय रूजावी, यासाठीच बोर्ड प्रशासनाने कचरा डबे खरेदी केले. मात्र, ते पडून आहेत. एकीकडे स्वच्छतेबाबत आपण किती जागरूक आहोत हे दाखविण्यासाठी बोर्ड प्रशासन जाहिरातबाजी करत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष कामांबाबत त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे, असाही आरोप होत आहे.

दरम्यान, स्वच्छतेच्या बाबतीत बोर्ड प्रशासन किती जागरूक आहे, हे या माध्यमातून स्पष्ट होत असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते संजय कवाडे यांनी सांगितले.

तर, बोर्डाच्या उपाध्यक्ष प्रियंका श्रीगिरी म्हणाल्या, “गेला महिनाभर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.डी.एन. यादव हे रजेवर होते. त्यांच्या अनुपस्थितीत हे काम झाले नाही. बोर्डातर्फे पुढील आठवड्यात एक जाहीर कार्यक्रम घेऊन या डब्ब्यांचे वाटप करण्यात येणार आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)