पुणे – कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात ( Cantonment Assembly Constituency) वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. १० वर्षांत वाहतुकीची समस्या जटिल झाली आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी यंदा परिवर्तन आवश्यक असून, मतदारांनी साथ देण्याचे आवाहन महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे ( Ramesh Bagwe) यांनी मतदारांना केले.
बागवे यांच्या प्रचारार्थ घोरपडी आणि बी. टी. कवडे रस्ता, दारूवाला पूल आणि सोमवार पेठ परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या वेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला. याप्रसंगी महिलांनी बागवे यांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या.
लोकसभेचे प्रभारी जगदीश ठाकूर, कॅटोन्मेंटचे प्रभारी राजेंद्र सिंह ठाकोरे, सुजाता शेट्टी, ब्लॉक अध्यक्ष असिफ शेख, सुधाकर पनीकर, संजय कवडे, प्रदीप परदेशी, अभिजित गायकवाड, नितीन निगडे, अक्रम शेख, युसूफ शेख, रॉबर्ट रोबारियो, महेश मिश्रा, अनिरुद्ध मिश्रा, प्रेम परदेशी, मनोज बाट्टम, तेजस गरसूल, अमोल परदेशी, संजय वाघमारे, रवी वाजपेयी, राजू नायडू, कुमार राठोड, प्रकाश बर्गे, मदीस रॉवडन, विल्सन रेड्डा, विल्सन डॅनियल, डेरियास स्वामी, रिहाना खान, अँटोनी, अंजली पिल्ले यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आप, तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रात व राज्यात भाजप सत्तेवर असूनही घोरपडीतील नागरिकांच्या वाहतुकीच्या समस्या सुटल्या नसल्याचा आरोप या वेळी बागवे यांनी केला.