पुणे – फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या “कॅटडॉग’ या चित्रपटानी कान्स चित्रपट महोत्सवात बाजी मारली.
पुण्यातील फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या “कॅगडॉग’ या चित्रपटाने कान्स महोत्सवाच्या विद्यार्थी गटात प्रथम क्रमांक पटकाविला. जगभरातील 444 चित्रपट शिक्षण देणाऱ्या संस्थांतून 1 हजार 952 चित्रपट प्राप्त झाले होते.
यामध्ये एफटीआयआयच्या 2013 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी काम पाहिले होते. अस्मिता गुहा नेओगी यांनी दिग्दर्शक, विनिता नेगी यांनी एडीटर, कुशाल नेरुरकर यांनी साऊंड डिझायनर, निरज सिंह यांनी प्रोडक्शन डिझायनर म्हणून काम पाहिले होते.
या चित्रपटाचे स्क्रिनिंग मे महिन्यातील महोत्सवात होणार होते. मात्र, करोना पार्श्वभूमीवर पूर्वनियोजित तारखांना पार पडला. परंतु, आयोजकांकडून मागील आठवड्यात विजेत्यांना गौरविण्यात आले.