नेवासा : अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा सहकारी बँकेमध्ये सुमारे ७०० विविध पदांवरील नोकरी भरतीबाबत उद्यापासून परिक्षार्थी उमेदवारांना या परीक्षेसाठी चक्क नगर जिल्हा सोडून थेट पुण्याला जावून परिक्षा द्यावी लागणार आहे. तरीही परिक्षार्थी उमेदवारांची घरची मंडळी तसेच नातलगांकडून आपल्या उमेदवाराची जिल्हा बँकेत वर्णी लागण्यासाठी पडद्या – आडून फिल्डिंग लावून सोंगट्या फिरविण्यासाठी वशिलेबाजीचे सुत कुठे काही जमते का? याचा कोनोसा सध्या परिक्षार्थी उमेदवारांचे नातलग मंडळी सध्या घेताना दिसून येत आहेत.
या जिल्हा बँक भरतीमध्ये वशिलेबाजी न होता सरळ भरती प्रक्रिया राबवावी अशी अपेक्षा सध्या अनेक परिक्षार्थींकडून होतांना दिसून येत आहे. अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा सहकारी बँक भरती प्रक्रियेतील घोटाळे थांबविण्यासाठी ही प्रक्रिया सध्या जिल्हा बँकेने ऑफलाइनऐवजी ऑनलाइन करण्याचे धोरण स्विकालेले आहे.
या भरती प्रक्रियेसाठी सहा कंपन्यांचे पॅनल गठित केलेले असून मात्र या पॅनलमध्येच घोटाळा होण्याची शक्यता परिक्षार्थींकडून सध्या व्यक्त होताना दिसून येत असून अनुभवाची बोगस प्रमाणपत्रे सादर केली जाण्याची शंका सध्या परिक्षार्थींकडून दबक्या आवाजात चर्चिली जात आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या भरती प्रक्रियेत वशिलेबाजी न होता सरळ भरती होवून परिक्षार्थींचे थेट बँकेत नेमणूक व्हावी अशी अपेक्षा परिक्षार्थींकडून होत आहे.
तर राजकारणाशी निगडित असलेल्या नातेवाईकांनी आपल्याच पाल्याची वर्णी थेट जिल्हा बँकेत लागण्यासाठी राजकीय कोनोसा घेवून वशिलेबाजीच्या सोंगट्या फिरविण्यासाठी त्यांच्याकडून सारिपाट आखला जात असल्यामुळे सर्वसामान्य उमेदवार मात्र या बाबींचा कानोसा घेवून आपली या जिल्हा बँकेत बिगर वशिलेची खरच वर्णी लागेल काय? या विवंचनेत सध्या अनेक परिक्षार्थीचे लक्ष लागेल आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या नोकर भरतीकडे सध्या अनेकांचे लक्ष लागून आहे.