पुण्यातील कर्करोगग्रस्त मुलांनी पंतप्रधानांना लिहिली पत्र

बाल कर्करोगासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याची मागणी

पुणे: आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनाच्या निमित्ताने पुण्यातील कर्करोगग्रस्त मुले आणि त्यांच्या पालकांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून बाल कर्करोगासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याची मागणी केली आहे. ही पत्र मोहीम कॅनकिड्स किड्सकॅन (द नॅशनल सोसायटी फॉर चेंज फॉर चाइल्डहुड कॅन्सर इन इंडिया),यांनी चालवलेली आहे.

कॅनकिड्सच्या अध्यक्ष पूनम बगाई यांनी यावेळी माहिती दिली की, जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे तीन लाख मुले कर्करोगाला बळी पडतात. त्यातील एक चतुर्थांश ही भारतीय मुले आहेत. देशातील सुमारे २५० रुग्णालयात कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार केले जातात. परंतु येथे केवळ ३० टक्के मुले उपचारासाठी पोहोचतात. यामुळेच राष्ट्रीय आरोग्य योजनेत बालपण कर्करोगाचा समावेश करणे फार महत्वाचे आहे.

हा उपक्रम आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन (आयसीसीडी) बद्दल जागृती मोहीमेच्या एक भाग आहे. नीति आयोगचे सभासद डॉ. व्ही.के पॉल (हेल्थ अँड न्यूट्रिशन व्हर्टिकलचे प्रमुख) यांनी ही मोहीम सुरू केली आहे. भारतातील २१ शहरांमध्ये आणि ६८ कर्करोग केंद्रांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे.

एका कॅन्सरग्रस्त मुलीचा पत्राचा काही भाग पुढीलप्रमाणे
नमस्कार, काका मोदी. माझे नाव मोहिनी कंकल आहे, माझे वय ५ वर्षं आहे. मला ब्लड कॅन्सर आहे. माझी आई रात्रंदिवस रडत असते. डॉक्टर काका असे म्हणत होते की माझ्या उपचारांना खूप पैसे लागतात. परंतु माझ्या वडिलांकडे खूप पैसे नाहीत. आपण संपूर्ण देशाला कोरोनाची लस दिली आहे. काका मलाही जीवदान द्या. माझा सारख्या मुलांच्या उपचारांची व्यवस्था करा. मी तुम्हाला हे ग्रीटिंग कार्ड पाठवित आहे. हे ग्रीटिंग कार्ड पहा, कोरोनासाठी आपण जे केले त्याचे अभिनंदन करण्यासाठी मी हातने हे ग्रीटिंग कार्ड बनवले आहे. मला अशा आहे की तुम्ही माझा हात धरून धीर देऊन मला बरे होण्यासाठी मदत करावी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.