Budget 2024 | Cancer Medicine: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी 2024-25 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक घोषणा केल्या. महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी त्यांनी कॅन्सरच्या तीन औषधांवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे. त्यामुळे कॅन्सरवरील ही अत्यंत महागडी औषधे स्वस्त होणार आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात कॅन्सर औषधांना कस्टम ड्यूटीतून सुट दिली आहे. कर्करोगा सारख्या दुर्धर आजारावरील महागड्या उपचाराने सर्वसामान्यांचे कंबरडे खर्चाने मोडत असते.
या त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये कर्करोगाच्या तीन औषधांवरील सीमाशुल्क सूट आणि क्ष-किरण उपकरणांवरील BCD मध्ये बदल केला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनाही मोठा दिलासा म्हणून याकडे पाहिले जात आहे.
कोणते आहेत तीन औषधे :
Trastuzumab Deruxtecan (स्तनाच्या कर्करोगासाठी किंवा गॅस्ट्रोएसोफेगल एडिनोकार्सिनोमासाठी), Osimeritinib (विशिष्ट उत्परिवर्तनांसह फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी) आणि Durvalumabs (फुफ्फुस आणि पित्त नलिकेच्या कर्करोगासाठी)
किंमत किती आहे :
ही तीन औषधे ब्रिटीश कंपनी AstraZeneca ने बनवली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रॅस्टुझुमब हे डेक्सटेकन एनहर्टू या ब्रँड नावाने विकले जाते, ज्याची किंमत 3 लाख रुपये आहे. तर, Osimertinib या ब्रँडच्या Tagrissu च्या 10 गोळ्यांची किंमत 1.51 लाख रुपये आहे. दुर्वालुमाबची किंमत 45 हजार 500 रुपये असल्याचं सांगितलं जात.
दरम्यान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, परदेशातून आयात केलेली औषधं खूप महाग आहेत. कस्टम ड्युटी हटवल्यानंतर ही औषधं स्वस्त होणार आहेत. त्यामुळे रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. कारण ही औषधं ब्रेस्ट कॅन्सर आणि लंग कर्करोगाच्या उपचारात वापरली जातात.
सूट दिल्यानंतर किती स्वस्त होणार औषधं :
मिळालेल्या माहितीनुसार, कस्टम ड्युटीमध्ये सूट मिळाल्याने ही औषधे 10 ते 20 टक्क्यांनी स्वस्त होऊ शकतात. याचाच अर्थ जर एखादी व्यक्ती Trastuzumab Dextecan चा डोस 2 लाख रुपयांना विकत घेत असेल, तर कस्टम ड्युटी हटवल्यानंतर त्याची किंमत 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कस्टम ड्युटी हटवल्यानंतर कॅन्सर रुग्णांवरील आर्थिक बोजा कमी होणार हे नक्की.
या तीन औषधांचा वापर कसा होतो :
Trastuzumab Deruxtecan: हे शरीराच्या इतर भागांमध्ये पसरलेल्या HER2-पॉझिटिव्ह स्तनाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे अँटीबॉडी-औषध संयुग्मित आहे (मेटास्टॅटिक). जठरासंबंधी कर्करोगासारख्या कर्करोगाच्या इतर प्रकारांमध्ये वापरण्यासाठी देखील याचा अभ्यास केला जात आहे.
Osimertinib: ही एक लक्ष्यित थेरपी आहे जी EGFR जनुकातील विशिष्ट उत्परिवर्तनांसह नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर (NSCLC) वर उपचार करण्यासाठी वापरली जाते. ईजीएफआर इनहिबिटरच्या पूर्वीच्या पिढ्यांसाठी प्रतिकार विकसित करणाऱ्या कर्करोगांविरूद्ध हे विशेषतः प्रभावी आहे.
Durvalumabs: हे एक इम्युनोथेरपी औषध आहे जे PD-L1 प्रथिने अवरोधित करून कार्य करते, रोगप्रतिकारक प्रणालीला कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करण्यास मदत करते. याचा उपयोग नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर (NSCLC) आणि युरोथेलियल कार्सिनोमा (मूत्राशयाचा कर्करोग) वर उपचार करण्यासाठी केला जातो.