कर्करोग आणि आपण

डॉ. चैतन्य जोशी

कर्करोग रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे, पण अनेकदा कर्करोगाचे निदान पटकन होत नाही. रुग्णाच्या शरीरातील कोणता भाग कर्करोगग्रस्त आहे याचे निदान करणेही डॉक्‍टरांना अवघड होते. पण शरीरातील सूक्ष्म पेशींच्या माध्यमातून आता कर्करोगाचे अचूक निदान करून त्यावर योग्य तो उपचार करणे सोपे होणार आहे.
“पॉझिटिव्ह बायोसायन्स’ या संशोधन कंपनीने नुकतीच आरएनए’ ही नवीन चाचणी पद्धत भारतात आणली आहे. या चाचणीद्वारे शरीरातील कोणता भाग कर्करोगग्रस्त झाला आहे हे शोधून त्यावर तातडीने उपचार करणे डॉक्‍टरांना शक्‍य होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर्करोग हा बदलणारा आजार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच प्रकारची उपचारपद्धती वापरता येत नाही. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर कर्करोगाचे स्वरूप उलगडून त्यावर उपचार करणे आवश्‍यक झाले आहे.
याच्यावर उपचार करण्यासाठी तो शरीरात कुठल्या प्रकारे वाढत आहे, हे पाहणे व ती जागा शोधून मग त्यावर उपचार करणे गरजेचे असते. कर्करोग झालेल्या व्यक्तींना केमोथेरपी दिली जाते किंवा शरीरातील तो भाग काढून टाकावा लागत असे. मात्र, आता संशोधकांनी कर्करोगाच्या उपचारपद्धतीत अधिकच अचूकता आणली आहे. “आरएनए’ या चाचणीतून कर्करोगाचा कुठला प्रकार व उपप्रकार आहे, शरीरात काय बदल होत आहेत, त्याला अनुसरून उपचारपद्धत ठरवणे आता शक्‍य झाले आहे. अमेरिका, चीन व कोरिया या देशांमध्ये या चाचण्या अनेक मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये करण्यात येत आहेत. त्यानंतर आता पहिल्यांदा भारतातील विविध रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील उपचारांसाठी “आरएनए’ चाचणीकरिता प्रयोगशाळा स्थापन करण्याचा विचार सुरू आहे. आरएनए’ चाचणी म्हणजे काय?
प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात “डीएनए’ व आरएनए’ असतात. हे सूक्ष्म “आरएनए’ कर्करोगाच्या पेशींमधील संबंध प्रस्थापित करतात. या सूक्ष्म “आरएनए’च्या तपासणीवरून रुग्णाच्या शरीरात नेमक्‍या काय घडामोडी सुरू आहेत, हे या चाचणीतून स्पष्ट होणार आहे. मात्र, ही तपासणी बायोप्सी झाल्यानंतरच करण्यात येईल. या तपासणीत रुग्णांची रक्त तपासणी करण्यात येऊन याद्वारे आजाराच्या तीव्रतेबाबत अचूक माहिती मिळेल. याशिवाय, शरीरातील कोणत्या भागात कर्करोग झाला आहे हे पाहून त्यावर उपचार करण्यात येतील.

कर्करोगाच्या पेशी मारणारी गोळी
स्वीडनमधील शास्त्रज्ञांनी कर्करोगावर उपचार करणारी गोळी तयार केली आहे. कर्करोगाच्या पेशींचा नायनाट करण्याची क्षमता या गोळीमध्ये आहे. कर्करोग हा दुर्धर आजार आहे. या आजाराचे प्रमाण वाढत आहे. मेंदू, छाती, त्वचा, मूत्रपिंड, हाड आदी विविध प्रकारचे कर्करोग आहेत. या कर्करोग उपचारासाठी वेदनादायी “केमोथेरपी’ उपचार पद्धत आहे. तसेच हे उपचार अत्यंत खर्चिक आहेत. त्यामुळे कर्करोग झाल्याचे समजल्यावर तो रुग्ण खचतो. त्यामुळेच स्वीडनमधील शास्त्रज्ञांनी कर्करोगावर उपचार करणारी गोळी तयार केली आहे. कर्करोगाच्या पेशींचा नायनाट करण्याची क्षमता या गोळीमध्ये आहे. या गोळीचे नामकरण “वॅकक्विनॉल-1′ असे केले आहे. या गोळीने मेंदूच्या कर्करोगाच्या पेशींना नाहीसे करण्याची ताकद आहे. या गोळीचे प्रयोग सर्वप्रथम उंदरावर करण्यात आले.

माणसातील कर्करोगाच्या पेशी या उंदरांमध्ये सोडण्यात आल्या. त्यानंतर त्यांचे निरीक्षण करण्यात आले. त्यांना नवीन गोळी दिल्यावर त्यांच्या शरीरातील मेंदूच्या कर्करोगांच्या पेशींची वाढ एकदम थांबली. या संशोधनाच्या चाचण्या यशस्वी झाल्यास शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपी आदी उपचार पद्धतीपासून रुग्णाला मुक्तता मिळू शकेल. अमेरिकेतील कारोलिंस्का इन्स्टिटयूट अँड उपसाला विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले. कर्करोगाच्या पहिल्या टप्प्यात कर्करोगाच्या पेशींमध्ये रेणूंची संख्या अधिक असते. कर्करोगाच्या पेशी मृतवत झाल्यास रेणूंच्या संख्येवर आपोआपच नियंत्रण येते. मात्र, कर्करोगाच्या पेशी कशा मरतात, याचे कोडे शास्त्रज्ञांना पडले आहे.

कर्करोगापासून मुक्ती देणारी ही नवीन पद्धत आहे. ही उपचार पद्धती विकसित झाल्यास अन्य प्रकारच्या कर्करोग नाहीसे करता येऊ शकतात. मात्र, आम्ही त्या दृष्टीने संशोधनाला प्रारंभ केलेला नाही. या गोळीच्या क्‍निनिकल पूर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर क्‍लिनिकल चाचण्या घेण्यात येतील. हे संशोधन जर्नल सेल’ मध्ये प्रसिद्ध झाले आहे. कर्करोग हा जीवघेणा आजार आहे. कर्करोग झाल्याचे कळताच रुग्ण अर्धाधिक गर्भगळीत होतो. कर्करोग पहिल्या टप्प्यात असल्यास तो निश्‍चितपणे बरा होऊ शकतो. जगात कर्करोगावर मात करण्यासाठी नवनवीन संशोधन होत आहे. यात कर्करोगाच्या पेशींच्या रचनेवरच हल्ला करणारे नवीन औषध शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे.

लहान मुलांमधील कर्करोग व त्वचेच्या कर्करोगावर हे नवीन औषध प्रभावीरीत्या काम करू शकते, हे न्यू साऊथ वेल्स विद्यापीठाच्या संशोधकांनी दाखवून दिले. नवीन औषध कर्करोगाच्या पेशींवरच हल्ला करून त्यांना निष्प्रभ करते. हा माराही अत्यंत वेगाने केला जातो. हे औषध प्रत्येक कर्करोगाच्या पेशीवर प्रभावी उपचार करू शकते. ही उपचार पद्धती म्हणजे केमोथेरपीचा नवीन अवतार आहे. या औषध वापराचे निष्कर्ष अत्यंत सत्कारात्मक आहेत. तसेच त्याचे औषधाचे दुष्परिणाम कमी आहेत. मात्र, संशोधकांनी यातील एक धोका दाखवला आहे. कर्करोगाच्या पेशींच्या रचनेवर हल्ला केला तरी काही प्रमाणात तो निष्प्रभ ठरू शकतो. कारण हृदय आणि स्नायूंमध्ये कर्करोगाच्या पेशी तयार होऊ शकतात, याकडेही लक्ष देणे गरजेचे ठरते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)