पुणे: लॉकडाऊनच्या काळामध्ये रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांच्या तिकीटांची रक्कम मंगळवारपासून रेल्वे स्थानकातील आरक्षण खिडक्यांवर मिळणार आहे. आरक्षण केंद्रांवर तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना पुणे विभागातील 9 स्थानकांवर तिकीटाचा परतावा मिळणार आहे. यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष वेळापत्रक जाहीर केले आहे.
पुणे विभागातील पुणे, तळेगाव, चिंचवड, सातारा, सांगली, कराड, मिरज, कोल्हापूर आणि बारामतीच्या रेल्वे स्थानकांतील आरक्षण कार्यालयांचे काम सुरू झाले आहे.
प्रवाशांना या खिडक्यांवर रद्द झालेल्या तिकीटांचा परतावा देखील मिळणार आहे. प्रवासाच्या दिनांकापासून पुढील 6 महिन्यामध्ये प्रवासी हा परतावा रेल्वेकडून घेऊ शकणार आहेत. मात्र परतावा मिळण्यासाठी पुरेसा वेळ असल्याने प्रवाशांनी स्थानकावर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आरक्षित तिकीटावरील प्रवास दिनांक – या तारखेपासून परतावा मिळणार
1. 22 ते 31 मार्च – 26 मेपासून
2. 1 एप्रिल ते 14 एप्रिल – 1 जूनपासून
3. 15 एप्रिल ते 30 एप्रिल – 7 जूनपासून
4. 1 मे ते 15 मे – 14 जूनपासून
5. 16 मे ते 31 मे – 21 जूनपासून
6. 1 जून ते 30 जून – 28जूनपासून