आरोग्य विभागातील विविध पदांच्या मुलाखती रद्द

पुणे – महापालिकेच्या आरोग्य विभागातील विविध पदांच्या मुलाखती रद्द करण्यात आल्याचे महापालिकेतर्फे कळवण्यात आले आहे. आरोग्य कार्यालयांतर्गत पुणे शहर एड्‌स नियंत्रण संस्थेकडे 11 समुपदेश, एक लॅब टेक्‍निशियन यांची एकवट मानधनावर सहा महिने करार तत्त्वावर भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या पदाच्या मुलाखती 19 मार्च रोजी होणार होत्या. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव त्या रद्द केल्या आहेत.

याशिवाय राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अस्थायी स्वरुपातील विविध पदे एकवट मानधनावर 11 महिने करार तत्त्वावर भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या पदाच्या मुलाखती 16 मार्च रोजी आयोजित केलेल्या मुलाखती काही अपरिहार्य कारणास्तव रद्द केल्या आहेत. अर्जदारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.