…तर होईल तुमचं पॅन कार्ड रद्द, आयकर विभागाने दिले महत्त्वाचे आदेश

नवी दिल्ली – आजच्या या डिजिटल युगामध्ये पॅन कार्ड असणं हे प्रत्येकासाठीच आवश्यक ठरतंय. प्राप्ती कर भरण्यापासून ते विविध कार्यालयीन उपयोगांसाठी पॅन कार्ड अत्यंत महत्वाचे आहे. पॅन कार्डचे हेच महत्व लक्षात घेता आता अनेक लोक आर्थिक व्यवहारांसाठी महत्वाचे असलेले पॅन कार्ड अर्थात पर्मनंट अकाउंट नंबर काढताना दिसतात.

अशात पॅनकार्ड आणि आधारविषयी नवीन माहिती समोर आली आहे. पॅन नंबरला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे. तुम्ही अद्याप तुमचा पॅन आधारशी लिंक केलेला नसेल तर आधी हे काम करा. अन्यथा 31 मार्चनंतर, ज्यांना पॅन आधारशी जोडलं जाणार नाही त्यांचे पॅनकार्ड 1 एप्रिल 2021 पासून डिअॅक्टिव्हेट केलं जाईल.

हे लक्षात घेता आता प्राप्ती कर विभागातर्फे पॅन कार्ड काढण्याची प्रक्रिया सुलभ व जलद गतीने व्हावी यासाठी आधार कार्ड आधारित पॅन कार्ड सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

असे काढा पॅन कार्ड

१) https://www.Incometaxindiaefiling.Gov.In या संकेतस्थळाला भेट द्या.

२) या संकेतस्थळावर डाव्या बाजूस ‘क्विक लिंक’ असा पर्याय दिसेल.

३) क्विक लिंक्स पर्यायाखाली ‘इन्स्टंट पॅन थ्रू आधार’ हा पर्याय दिसेल. येथे क्लिक करावे.

४) वरील पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ‘गेट पॅन’ व ‘चेक स्टेटस/ डाउनलोड पॅन असे दोन पर्याय दिसतील’. यातील पहिला पर्याय हा नवे पॅन कार्ड काढण्यासाठीच आहे. त्यामुळे पहिल्या पर्यायावर क्लिक करावे.

५) यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म येईल. यामध्ये मोबाईल क्रमांकाशी जोडलेला आधार क्रमांक भरावा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.