‘कालवा फुटला, तर पुणे महापालिकाच जबाबदार!’

पुणे – महापालिकेकडून कालव्या नजीकच्या रस्त्यांची, तसेच पाइपलाइन टाकण्याची कामे करण्यात येत आहेत. या कामा दरम्यान आणि कालव्यानजीकची अनधिकृत बांधकामे, बेकायदा रस्ते, त्यावरील वाहतुकीमुळे जर कालवा फुटला, तर त्याला सर्वस्वी महापालिका जबाबदार आहे, असा लेटर बॉम्ब जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे. या आधीही कालव्यानजीक असलेल्या अतिक्रमणांवर जलसंपदा विभागाने आक्षेप घेत ती अतिक्रमणे हटवा असे पत्र महापालिकेला दिले होते.

तर, पाटबंधारे खात्याने पाठवलेल्या पत्राला महापालिकेने उत्तर दिल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. कालव्याच्या दुरुस्तीबाबतही पाटबंधारे खात्याने केलेली मागणी ही अवाजवी असून, कालव्याच्या पाण्याच्या बाजूची सुरक्षा करण्याची जबाबादारी पूर्णपणे पाटबंधारे खात्याची असल्याचे महापालिकेने उत्तरात ठणकावून सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.