Canadian Border Service Agency । भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. संबंध बिघडत असताना दिल्लीने कॅनडाच्या बॉर्डर सर्व्हिस एजन्सीच्या अधिकाऱ्याचे नाव पळून गेलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केले आहे. भारताला या यादीत समाविष्ट दहशतवाद्यांना कॅनडातून हद्दपार करायचे आहे.
समोर आलेली माहितीनुसार, प्रतिबंधित इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन (ISYF) चे सदस्य आणि CBSA मध्ये सेवारत संदीप सिंग सिद्धू यांचा पंजाबमधील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली यादीत समावेश करण्यात आला आहे.
सिद्धू आयएसआयच्या संपर्कात होता Canadian Border Service Agency ।
2020 मध्ये बलविंदर सिंग संधूची हत्या करण्यासाठी सिद्धू पाकिस्तानस्थित खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे तसेच इतर आयएसआय कार्यकर्त्यांच्या संपर्कात होता. संधू खलिस्तानी दहशतवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी ओळखले जात होते. फुटीरतावादी चळवळीत ते प्रतिकाराचे प्रतीक बनले.
संधू यांना त्यांच्या शौर्याबद्दल शौर्य चक्रानेही सन्मानित करण्यात आले होते. शिख फॉर जस्टिस (SFJ) तर्फे अमेरिका आणि कॅनडात खलिस्तानी सार्वमताला विरोध करण्यासाठीही त्यांची ओळख होती. एका वृत्तानुसार, संदीप सिंग सिद्धू यांना कथितरित्या CBSA मध्ये अधीक्षक पदावर बढती देण्यात आली होती.
BREAKING: India has shared info with Trudeau Govt on Sandeep Singh Sidhu, a Khalistani terrorist employed with the Canadian Govt’s @CanBorder Service Agency. #CanadianTerrorists pic.twitter.com/WNhNGdp9Zj
— Shiv Aroor (@ShivAroor) October 18, 2024
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) सांगितले की, कॅनडाचा खलिस्तानी ऑपरेटिव्ह सनी टोरंटो आणि पाकिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग उर्फ रोडे संधू हे या हत्येचे सूत्रधार आहेत. मात्र, संदीप सिंग सिद्धूचे दुसरे नाव सनी टोरंटो आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.
भारत-कॅनडा संबंधात तणाव Canadian Border Service Agency ।
भारत आणि कॅनडाचे संबंध अलिकडच्या वर्षांत सर्वात वाईट टप्प्यातून जात आहेत. अलीकडेच कॅनडाने खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांचे ‘संशयास्पद व्यक्ती’ असे वर्णन केले होते. हे आरोप फेटाळून लावत भारताने आपल्या सहा राजनयिकांना परत बोलावले होते. कॅनडाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की, देशात राहिलेले भारतीय मुत्सद्दी देखील ‘नोटीसवर’ आहेत.
कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी शुक्रवारी सांगितले की, व्हिएन्ना कराराचे उल्लंघन करणाऱ्या किंवा कॅनेडियन लोकांचे जीवन धोक्यात घालणाऱ्या कोणत्याही मुत्सद्द्याला सरकार खपवून घेणार नाही. भारताने सोमवारी सहा कॅनडाच्या मुत्सद्यांची हकालपट्टी केली आणि हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येच्या तपासात भारतीय राजदूताचा संबंध असल्याचा ओटावाचा आरोप फेटाळल्यानंतर कॅनडातील आपल्या उच्चायुक्तांना परत बोलावत असल्याची घोषणा केली.