Canada Open 2023 : भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत अजिंक्यपदाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात त्यानं चीनच्या ली शी फेंग याचा 21-18, 22-20 असा थेट गेम्समध्ये पराभव केला.
दुसऱ्या गेममध्ये लक्ष्य सेन एका क्षणी 16-20 असा पिछाडीवर होता, पण त्यानं चिवट झुंज देत अजिंक्यपद मिळवलं आणि आपल्या कारकीर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोवला.
दरम्यान, भारतीय बॅटमिंटनपटू लक्ष्य सेननं केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे.