ओटैवा – कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत बारतीय वंशाचे चंद्रा आर्य अधिकृतपणे उतरले आहेत. लिबरल पार्टीकडून पक्षाचे नेते निवडले जाण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पक्षांतर्गत निवडऩणुकीसाठी आर्य यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्या साठी ५० हजार कॅनडीयन डॉलरची अनामत रक्कमदेखील त्यांनी जमा केली आहे. आपल्याला एक हजार सदस्यांचा पाठिंबा मिळाला आहे, तसेच कॅनडातल्या प्रत्येकी तीन प्रांतांमधून अतिरिक्त २०० सदस्यांचा पाठिंबाही आपल्याला मिळाल्याचा दावा आर्य यांनी केला आहे.
या नेतेपदाच्या निवडीसाठी लिबरल पार्टीमध्ये २३ जानेवारीला निवडणूक होणार आहे. देशाला संरचनात्मक आव्हानांचा सामना करावा लागत आहेय या आव्हानांचे निराकरण करण्याची आवश्यकता आहे. कॅनडाच्या मुलांची आणि नातवंडांची समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे यावर त्यांनी भर दिला. देशाच्या फेरउबारणीसाठी परिणामकारक प्रशासनावर आपला भर असेल, असे एका व्हिडीओ संदेशात त्यांनी म्हटले आहे.