Canada on Amit Shah खलिस्तानवादींवरून निर्माण झालेला भारत-कॅनडा संघर्ष आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय. खलिस्तानवाद्यांचा कळवळा असलेल्या कॅनडाने आता थेट भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आरोप करत कळसच गाठलाय. भारताने कट रचून कॅनडातील खलिस्तानी नेत्यांना लक्ष्य केल्याचं म्हंटलंय. तसेच यामध्ये अमित शहा यांचा हस्तक्षेप असल्याचा गंभीर आरोप देखील कॅनडाकडून करण्यात आला आहे. कॅनडाच्या या आरोपांवर भारताने तीव्र संताप व्यक्त करत, हा सर्व प्रकार “मूर्खपणाचा आणि निराधार” असल्याचं स्पष्ट केलं आहे.
कॅनडाच्या उच्चायुक्तांना बोलावून तंबी Canada on Amit Shah
शुक्रवारी कॅनडाच्या उच्चायुक्तांना बोलावून भारताने या आरोपांवर थेट आक्षेप नोंदवला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, “हे आरोप इतके हास्यास्पद आहेत की त्यावर बोलायला देखील नको वाटतं.” ऑक्टोबर २९ रोजी ओटावात झालेल्या बैठकीत कॅनडाचे उप-परराष्ट्र मंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी केलेली वक्तव्यं भारतावर चेखलफ़ेक करणारी असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
माध्यमांमधून भारताविरोधात चिखलफेक Canada on Amit Shah
विशेष म्हणजे कॅनडाने या आरोपांबाबतची माहिती आंतरराष्ट्रीय माध्यमांना “लीक” करून देत भारताविरुद्ध वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नथाली ड्रोइन आणि उप-परराष्ट्र मंत्री मॉरिसन यांनी वॉशिंग्टन पोस्टला माहिती पुरवत अमित शहांचं नाव यामध्ये गोवलं, मात्र कोणताही ठोस पुरावा नसताना आरोप केलेच कसे, असा सवाल आता भारताकडून विचारण्यात आला आहे.
कॅनडा आणि भारताच्या संबंधांमध्ये गेल्या वर्षीपासूनच तणाव वाढू लागला आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर हरदीप सिंह निज्जर याच्या हत्या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला होता. भारताने तेव्हाच हा आरोप फेटाळून लावला होता. अशातच आता पुन्हा एकदा कॅनडाकडून असेच निराधार आरोप समोर येत असल्याने भारताने कॅनडाला “भान ठेवण्याचा’ सल्ला दिला आहे. Canada on Amit Shah
निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांचे राज ठाकरेंना ओपन चॅलेंज! म्हणाले, ‘एक तरी…’