पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांततेचा नोबेल मिळणार ?

भारतीय जनता पार्टी तामिळनाडूच्या प्रदेशअध्यक्षा तामिळसाई सुंदरराजन यांच्यामते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार पाहिजे. त्यासाठी पुढचे पाऊल उचलून त्यांचे पती प्रा. डॉ . पी. सुंदररराजन यांनी नामांकन अर्जातून नरेंद्र मोदींचे नाव सुचवले आहे.  प्रा.डॉ.पी. सुंदररराजन हे एका खाजगी विध्यापिठात नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख आहेत.

तामिळनाडूच्या बीजेपी प्रदेशअध्यक्षा तामिळसाई सुंदरराजन यांचे याबाबतचे ट्विट समोर आले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहले आहे की, नरेंद्रा मोदी यांनी सुरु केलेल्या ‘आयुष्यमान भारतचा लाभ मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्येला होणार आहे आणि त्यामुळे ही योजना विश्वस्तरावर उल्लेखनीय ठरेल असे त्यांचे मत आहे. त्यामुळे त्यांना वाटते की मोदींना नोबेल मिळावा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

२००९ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  बराक ओबामा यांना देखील शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. पाच भारतीयांना नोबेल पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ मध्ये साहित्याचा नोबेल, १९३०मध्ये प्रसिद्ध वैज्ञानीक सी.व्ही.रमण यांना भौतीकशास्त्राचा नोबेल,  १९७९मध्ये मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल, १९९८ मध्ये अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्राचा नोबेल तर २०१४ मध्ये कैलाश सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल मिळालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)