अफवेवर विश्‍वास नको : “या’ गोष्टींनी ऑक्‍सिजनची पातळी वाढत नाही

वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांचे स्पष्टीकरण

भारतात कोरोना व्हायरसचा उद्रेक उद्रेक शिगेला पोहोचला आहे. पुन्हा एकदा मागील वर्षांसारखी स्थिती निर्माण झाली आहे अशात साथीच्या आजाराची भीती आणि अनेक प्रकाराच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. एक उपाय व्हॉट्‌सऍप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉमवर सुरु आहे ज्यात घरगुती उपायाने ऑक्‍सिजनची पातळी वाढवता येते असा दावा केला जात आहे. यात सांगण्यात येत आहे की कपूर आणि ओवा हे एका रुमालात बांधून वारंवार वास घेतल्याने ऑक्‍सिजनची पातळी वाढते. परंतु हे कितपत सत्य आहे?

गुजरातच्या एका खासगी रुग्णालयातील एका डॉक्‍टरचा हवा देत असे सांगण्यात येत आहे की, गुजरातमधील एक मुलगा कोरोना पॉजिटिव्ह होता. त्याची ऑक्‍सिजन पातळी 80-85 पर्यंत कमी झाली होती. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्याला रुग्णालयात दाखल करणे गरजेचं होतं. परंतु त्याच्या घरच्यांनी एक घरगुती उपाय केला. त्याच्या घरच्यांनी कापराची वडी आणि एक चमचा ओवा एका रुमालात बांधून त्या मुलाला 10 ते 12 वेळा खोल श्वास घेण्यास सांगितला. प्रत्येक दोन तास असं करत राहिल्यानंतर 24 तासात त्याच्या ऑक्‍सिजनची पाळती 98-99 पर्यंत पोहचली आणि रुग्णालयात जाण्याची पाळी आली नाही. त्यांच्या एका मित्राला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यावर देखील हा उपाय केल्यावर चांगले परिणाम दिसून आले आणि त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

हा संदेश वाचून अनेकांनी संबंधित रुग्णालय आणि डॉक्‍टरशी संपर्क साधला असता, ही माहिती आणि संदेश हा चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. कापूर आणि ओव्याचा वापर केल्याने ऑक्‍सिजनची पातळी वाढत असल्याचा कोणताही अभ्यास अथवा संशोधन मान्यताप्राप्त नाही, असे संबंधित रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे कोणीही अशा खात्रीलायक नसलेल्या पोस्टवर विश्‍वास ठेवून कसलेही घरगुती उपाय करण्यापेक्षा संभाव्य रुग्णाला तातडीने दवाखान्यात दाखल करावे. कोणीही अशा आशयाचा संदेश तुम्हाला पाठवला, तर खातरजमा न करता असा अनधिकृत संदेश व्हायरल करु नये, असा सल्लाही या रुग्णालयाने दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.