मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीचे आवाहन 

 "कोविड 19' या नावाने स्वतंत्र बॅंक खाते 

मुंबई (प्रतिनिधी) – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार काटेकोर उपाययोजना करत असून या उपाय योजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत. करोनाच्या विरोधातील लढाईला आर्थिक बळ मिळावे म्हणून जे मुख्यमंत्री साहाय्यता निधीस मदत करत आहेत किंवा करू इच्छित आहेत त्यांच्या प्रयोजनार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधी “कोविड-19′ हे स्वतंत्र बॅंक खाते स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले असून देणगीदारांना आयकर कपातीतून 100 टक्के सूट मिळणार आहे.

उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19 या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

खात्याची सविस्तर माहिती 
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बॅंकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बॅंक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300.
आयएफएससी कोड एसबीआय0000300.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.