पुन्हा एकदा “संघर्षा’ची हाक

पंकजा मुंडे काढणार राज्यभर “मशाल दौरा’
बीड : भाजप पक्ष मी सोडणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी आज आपल्या भाषणातून ठणकावून सांगितले. तसेच 27 जानेवारीला औरंगाबादमध्ये उपोषण करणार असून त्यानंतर राज्यभर मशाल दौरा करणार असल्याचा निश्‍चय त्यांनी व्यक्‍त केला. सोबतच कोअर कमिटीतून मला मुक्त करा, असे आवाहन तयांनी केले.

लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या जन्मदिनानिमित्त परळीत पार पडलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. तर दुसरीकडे गोपीनाथगडावरील मेळाव्याच्या व्यासपीठावरुन भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. मुठभर लोकांचा पक्ष आज बहुजनांचा झाला आहे. पण हा पक्ष पुन्हा रिव्हर्समध्ये जाऊ नये. बहुजनांचा पक्ष पुन्हा मुठभर लोकांच्या हाती जाऊ नये, अशी सुचना देत त्यांनी पुन्हा एकदा संघर्षाची हाक दिली.

पंकजा मुंडे बेमाईन होणार नाही. आता भाजपने आत्मचिंतन करावे. आता बॉल भाजपच्या कोर्टात आहे. मुख्यमंत्री माझा भाऊच आहे. गोपीनाथरावांच्या नावाने पदर पसरायचा नाही. 26 जानेवारीला गोपीनाथ प्रतिष्ठानचे कार्यालय, 27 जानेवारीला औरंगाबादेत लाक्षणिक उपोषण करणार आहे.
– पंकजा मुंडे

पंकजा मुंडे म्हणाल्या, बेईमानी आपल्या रक्तात नाही. आपण पक्ष सोडणार नाही, जर पक्षाला आपल्यावर कारवाई करायची असेल करा, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. आपण कुठल्याही पदासाठी दबावाचा वापर केला नाही. जर कुणाला तसं वाटत असेल तर कोअर कमिटीतून आपण बाहेर पडत असल्याची घोषणाही त्यांनी केली. त्यामुळे पक्षांतर्गत दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न पकंजा आणि एकनाथ खडसेंनी केल्याचे पाहायला मिळले.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर आज मेळावा पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. त्याचबरोबर बीड जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो कार्यकर्ते मेळाव्यात सहभागी झाले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.