हडपसरमध्ये आता परिवर्तनाची हाक

महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांची कोंढव्यात पदयात्रा

कोंढवा – “आम्हाला बदल हवाय, आमचा नेता आमच्यापैकी एक असावा, आमचे ऐकणारा, आमचे प्रश्‍न सोडवणारा हवाय, समतोल विकास साधून पुढे नेणारा प्रतिनिधी हवाय’ अशी अपेक्षा रविवारी कोंढवा परिसरातील नागरिकांनी महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांच्याकडे व्यक्त केली. त्यावर “माझ्या माता -भगिनींच्या माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे,’ असा विश्‍वास तुपे यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि मित्रपक्ष महाआघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन तुपे यांनी आज कोंढवा बुद्रुक परिसरात प्रचार फेरीद्वारे जनतेशी संवाद साधला.

येथील स्व. दशरथ मरळ चौक, मल्हार चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भोलेनाथ चौक, चांदतारा चौक, शिवराज चौक, दत्त मंदिर-गोकुळनगर परिसरात प्रचार फेरीदरम्यान लोकांशी संवाद साधला. या भागातल्या तरुणांनी एकत्र येत कोंढवा बुद्रुक परिसरात बाइक रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली.

गेल्या पाच वर्षांमध्ये हडपसर मतदारसंघाची ओळख वाहतूक कोंडी, घाणींचे साम्राज्य, भ्रष्ट लोकप्रतिनिधी आणि निष्काळजी प्रशासन अशी झाली असल्याचे तुपे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.