कॅलिफोर्निया वॉलनटस्‌चे आकर्षक-चविष्ट खाद्यपदार्थ

पावसाळा सुरू झाला आहे आणि त्यासोबत चविष्ट भजी व जिभेला पाणी आणणाऱ्या चटण्यांचा सीझनही आला आहे. हे भारतीय पावसाळ्यातील पदार्थ आपल्या जिव्हाळ्याचे विषय असताना आपल्या पदार्थांमध्ये पोषण आणि आणखी चव आणण्यासाठी कॅलिफोर्निया वॉलनटस्‌चा समावेश का करू नये. अल्फा लिनोलेनिक ऍसिड या रोपांमधून आलेल्या ओमेगाने युक्त असलेले अक्रोड हे सर्व खाद्यपदार्थांच्या प्रेमींसाठी आवडते नटस्‌ आहेत.

चला तर मग, कॅलिफोर्निया वॉलनटस्‌चा वापर करून खास पद्धतीने तयार केलेल्या आकर्षक आणि चविष्ट खाद्यपदार्थांसोबत पावसाळ्याचा आनंद घेऊया.

कॅलिफोर्निया वॉलनटस्‌ बाऊल

ग्रिल्ड व्हेजिटेबल्स विथ नूडल्स अँड रोझमेरी
साहित्य : 800 ग्रॅम झ्युकिनी, 1 लाल सिमला मिरची, 2 हिरव्या सिमला मिरच्या, 1 कांदा, 2 गाजर, 3 मोठे चमचे सोया सॉस, ग्लुटेनमुक्त, 2 टेबलस्पून एक्‍स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, 60 ग्रॅम रोझमेरी कॅलिफोर्निया वॉलनटस्‌
सजावटीसाठी : तीळ आणि रोझमेरी अक्रोड,
कृती: 1. ज्युलियन पद्धतीने कांदे आणि गाजरे सोलून कापा.
2. लाल आणि हिरवी सिमला मिरची धुवून ज्युलियन पद्धतीने कापा.
3. एका मोठ्या भांड्यात किंवा कढईत तेल गरम करा आणि भाज्या परतून घ्या.
4. दरम्यान झ्युकिनी धुवा आणि स्पायरलायजरने किंवा त्यांना ज्युलियन पद्धतीने कापून लांब स्पॅगेटीसारखे पट्टे बनवून कापून घ्या.
5. भाज्या शिजवून झाल्यावर 10 मिनिटांनी नूडल्स व रोझमेरी अक्रोड घाला आणि 4-5 मिनिटे परता. सोया सॉस घालून 1 मिनिट शिजवा.
6. बाऊलमध्ये वाढून थोडे रोझमेरी अक्रोड घाला आणि त्यासोबत थोडे तीळ भुरभुरा.

रोझमेरी अक्रोडांसाठी : एक पसरट भांडे मध्यम आचेवर ठेवा, ऑलिव्ह ऑइल घाला आणि पॅनमध्ये पसरवण्यासाठी ते फिरवा. अक्रोड व रोझमेरी घाला आणि उष्णता कमी करा. सारखे हलवत राहा, अक्रोड सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजा, सुमारे 5-10 मिनिटे. आचेवरून काढा आणि गरजेनुसार मीठ घाला.

कॅलिफोर्निया अक्रोड आणि मशरुम सूप
साहित्य : 1 टेबलस्पून एक्‍स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, 450 ग्रॅम ताजे मशरुम, बारीक कापलेले, 2/3 कप बारीक कापलेले शॅलोट्‌स, 400 मिलि भाज्यांचे उकळलेले पाणी, 1 अर्धा टीस्पून बारीक कापलेले ताजे थाइम किंवा अर्धा टीस्पून सुकवलेले थाइम, 1 कप कॅलिफोर्निया अक्रोड, अर्धे कापलेले, 1/2 कप पाणी, ताजी बारीक केलेली काळी मिरी आणि चवीपुरते मीठ
कृती : 1. एका सॉसपॅनमध्ये मध्यम ते जास्त आचेवर तेल गरम करा. मशरुम आणि शॅलॉट घाला आणि पाच मिनिटे मऊ होईपर्यंत शिजवा.
2. भाज्यांचे पाणी व हर्ब्स घाला आणि उकळी आणा. उष्णता कमी करून झाकून 5 मिनिटे शिजू द्या.
3. अक्रोड आणि पाणी एका फूड प्रोसेसर किंवा ब्लेंडरमध्ये घाला. एका बारीक पेस्टसारखे दिसेपर्यंत अक्रोड बारीक करून घ्या.
4. हे मशरुमच्या मिश्रणात घाला आणि त्यावर मीठ तसेच बारीक केलेली काळीमिरी घाला. 5 मिनिटे किंवा थोडेसे घट्ट होईपर्यंत त्याला झाकून मध्यम ते कमी आचेवर शिजवा.
5. आहे तसे खायला द्या किंवा सूपला ब्लेंडरने मऊ होईपर्यंत बारीक करा.

कॅलिफोर्निया वॉलनट- क्रस्टेड गोटस्‌ चीज बॉल्स.
साहित्य : 100 ग्रॅम टोस्ट केलेले कॅलिफोर्निया अक्रोड, नीट बारीक केलेले, 1 लिंबाची साल, 1 टेबलस्पून बारीक केलेले चिव्हस, 250 ग्रॅम मऊ बकरीचे चीज.
कृती : कॅलिफोर्निया अक्रोडांना लेमन झेस्ट आणि बारीक केलेले चिव्हस लावा.छोट्या चमच्याने बकरीच्या चीजचे गोळे बनवा आणि त्यांना अक्रोडाच्या मिश्रणाने समानपणे थर लावा. तुमचे कॅलिफोर्निया वॉलनट क्रस्टेड गोटस्‌ चीज बॉल खायला तयार आहेत.

– श्रुती कुलकर्णी

Leave A Reply

Your email address will not be published.