पीडितेशी लग्न केल्यास बलात्काऱ्यास शिक्षेत दिलासा… (भाग-२)

लग्नाच्या आमिषाने वारंवार बलात्कार केला. मात्र, लग्न करण्यास नकार दिला तर अपराध्याला शिक्षा तर होतेच मात्र जर त्या पीडितेशी त्याने लग्न केले तर खटल्यादरम्यान भोगलेली शिक्षा एकूण शिक्षेतून कमी होऊ शकते, असा निकाल कलकत्ता उच्च न्यायालयाने दिला आहे.

पीडितेशी लग्न केल्यास बलात्काऱ्यास शिक्षेत दिलासा… (भाग-१)

सन 2018 पूर्वी झालेल्या घटनेमध्ये हा निकाल झाला असला तरी सन 2018 साली बलात्काराच्या कलमात झालेल्या बदलाने भविष्यात वर्षानुवर्ष असे खटले चालणार नाहीत अशा तरतुदी केल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

21 एप्रिल 2018 रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता, बाल लैंगिक अत्याचार व भारतीय दंड संहितामध्ये सुधारणा करणारा वटहुकूम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सहीने पारीत झाला. त्यातील महत्त्वाच्या तरतुदीमुळे बलात्कार पीडितांना योग्य न्याय मिळण्यास मदत होईल.

त्या तरतुदीची प्रमुख वैशिष्ट्‌ये
– बलात्कार करणाऱ्या आरोपीला कमीत कमी 7 वर्षांऐवजी 10 वर्ष शिक्षा करण्यात आली.
– 16 वर्षांच्या आतील मुलीवर अत्याचार करणाऱ्यास कमीत कमी 20 वर्ष शिक्षा.
– 12 वर्षांखालील मुलीवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कमीत कमी 20 वर्ष अथवा मृत्युदंड ही शिक्षा.
– संबंधित पीडितेला दवाखाना व इतर बाबींसाठी पुरेशी भरपाई.
– पोलीस अधिकारी जर अपराधी असेल तर कमीत कमी 10 वर्ष शिक्षा.
– 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर गॅंगरेप करणाऱ्यांमध्ये सहभागी प्रत्येकाला मृत्यूूदंड.
– पूर्वी ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असेल त्या पोलीस स्टेशन अंतर्गत ठिकाणी असा शब्द काढून कुठेही त्या पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार केला तरी तो कमीत कमी 10 वर्ष शिक्षेस पात्र.
– बलात्काराच्या घटनेचा तपास अवघ्या तीन महिन्यांत संबंधित पोलीस अधिकारी यांनी करायचा आहे.
– अशा घटनेचे अपील सहा महिन्यांत निकाली लावायचे आहे.
– 16 वर्ष वयापेक्षा कमी वयाच्या मुलीवर अत्याचार असल्यास अटकपूर्व जामीन नाही.
– कलम 439 मध्ये सुधारणा करून बलात्कारातील संशयिताला जामीन अर्जावर सुनावणी होताना प्रत्यक्ष न्यायालयात हजेरी गरजेची.

अशा वैशिष्ट्‌यपूर्ण सुधारणा केल्याने बलात्कारातील आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व पीडितेचे पुनर्वसन होणार आहे. तसेच कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निकालाने लग्नाचे आमिष दाखवुन अत्याचार करणाऱ्यास शिक्षा नक्की होईल व अपवादात्मक परिस्थीतीत खटल्यादरम्यान भोगलेली शिक्षा एकूण शिक्षेतून वजा होवू शकते हे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)