कॅगचा अहवाल म्हणजे ‘चौकीदार ऑडिटर जनरल’ रिपोर्ट – राहुल गांधी 

नवी दिल्ली – राफेल व्यवहाराच्या संबंधातील कॅगचा अहवाल आज संसदेत सादर होणार आहे. परंतु त्याआधीच काँग्रेस अध्यक्ष  राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत राफेल व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलेच घेरले. कॅगचा अहवाल म्हणजे ‘चौकीदार ऑडिटर जनरल’ रिपोर्ट अशी व्याख्या यावेळी राहुल गांधींनी केली. तसेच यावेळी एका एअरबस कंपनीच्या कर्मचाऱ्याने लिहलेल्या इ-मेलचा हवाला देत राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांचे मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेच्या १० दिवस आधीच उद्योगपती अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या करारासंदर्भात संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री तसेच हिंदुस्थान एरोनॉटिक्स (HAL) यांनाही माहित नव्हते. पंतप्रधान मोदींनी गोपनीयतेचे उल्लंघन केले असून देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधींनी केली.

कॅगच्या अहवालसबंधी बोलताना राहुल गांधी म्हणाले, कॅगचा अहवाल म्हणजे ‘चौकीदार ऑडिटर जनरल’ रिपोर्ट आहे. तर हा अहवाल म्हणजे एकप्रकारे चौकीदाराने चौकीदारसाठी चौकीदारांच्या वतीने चौकीदारांसाठी लिहिलेला अहवाल आहे, असे त्यांनी म्हंटले.

Leave A Reply

Your email address will not be published.