कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू

बंगळूरू : कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 36 तासानंतर त्यांचा मृतदेह नेत्रावती नदीमध्ये सापडला आहे. ते सोमवारपासून बेपत्ता होते. व्ही. जी. सिद्धार्थ हे कॅफे कॉफी डेचे संस्थापक, मालक आणि भाजपा नेते एस. एम. कृष्णा यांचे जावई होते. दरम्यान, त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करून त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे.

गेल्या 36 तासांपासून कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता होते. बंगळुरुहून साकलेशपूरला जात असताना ते नेत्रावती नदीच्या पुलावर उतरले. त्यानंतर त्यांनी कार घेऊन ड्रायव्हरला पुढे जाऊन थांब असे सांगितले. त्यावेळी ते फोनवर बोतल होते असे त्यांच्या ड्रायव्हरने सांगितले. त्याने जवळपास अर्धा तास सिद्धार्थ यांची वाट पाहिली परंतु, ते न आल्याने ड्रायव्हरने त्यांना फोन केले तर तो बंद लागला त्यामुळे लगेच सिद्धार्थ यांच्या कुटूंबियांना फोन लावला आणि याबाबतची माहिती दिली. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. अखेर त्यांचा मृतदेह हाती लागला आहे. सोमवार संध्याकाळपासून ते बेपत्ता झाले होते. त्यांच्या शोधासाठी 200 हून अधिक पोलिस, शोधपथक आणि 25 बोटींची मदत घेण्यात आली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.