केबल व्यावसायिकांची कर कमी करण्याची मागणी

महापौर वाकळे यांची घेतली भेट एकच कर आकारण्याची केली मागणी

नगर – केंद्र सरकारच्या धोरणानुसार देशभरात जीएसटी आकारण्यात येत असून ही शहरातील केबल व्यावसायिकांवर महापालिका करमणूक कराचा बोजा टाकत आहे. हा अन्याकारक कर आकारणी पालिकेने बंद करावी अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे केबल व्यावसायिकांनी केली.

यावेळी रिटा अष्टेकर, गोवर्धन जाधव, रवींद्र राणा, नामदेव खंदारे, संदीप कोरेकर, किरण बारस्कर, अजय दंडवते, संजय शेकडे, ज्ञानेश्‍वर राहिंज, विजय साठे, आकाश वग्गा, अशोक वग्गा, अंबादास राहिंज, निलेश चांदणे, जहांगीर पठाण, भाऊसाहेब मोरे, पी. ए. वाघ आदींनी दिले. नगर शहरात अनेक वर्षांपासून ग्राहकांना केबल सेवा पुरवत आहेत. त्याबद्दल असणारा महाराष्ट्र शासनाचा करमणूक कर आम्ही पूर्वी शासनाकडे जिल्हाधिकारी कार्यालय नगर यांच्याकडे चलनाद्वारे जमा करत होतो.

1 जुलै 2017 पासून केंद्र सरकारच्या धोरणानुसर एक देश एक कर या तत्वाप्रमाणे नवीन करप्रणाली वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाली. त्यामुळे राज्यशासनाचा तसेच स्थानिक स्वराज संस्थांचे सर्व कर रद्द झालेले. राज्यशासनाचा करमणूक कर बंद झाल्यानंतर केंद्र सरकारच्या 18 टक्के प्रमाणे आम्ही 2017 पासून, ते आजपर्यंत सर्व प्रकारचा कर जीएसटीच्या रूपाने एमएसओच्या माध्यमातून भरत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.