कॅबिनेट सचिव सिन्हा यांना तीन महिने कार्यकाळवाढ

नवी दिल्ली -कॅबिनेट सचिव प्रदीपकुमार सिन्हा यांच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली. त्यामुळे ते आणखी तीन महिने त्या पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. सिन्हा यांची मे 2015 मध्ये दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी कॅबिनेट सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 2017 आणि 2018 मध्ये त्यांचा कार्यकाळ प्रत्येकी एक वर्षासाठी वाढवण्यात आला.

आता तिसऱ्यांदा त्यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने घेतला. त्यामुळे देशाच्या इतिहासात सर्वांधिक काळ कॅबिनेट सचिवपद भुषवण्याचा मान सिन्हा यांना मिळाला आहे. कॅबिनेट सचिवालय थेट पंतप्रधानांच्या अखत्यारीत येते. त्या सचिवालयाचे प्रशासकीय प्रमुख कॅबिनेट सचिव असतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.