मंत्रिमंडळात माझ्यासाठी जागा राखीव : प्रा. शिंदे

तर मी साक्षीदार होईल

“बारामतीवाल्यांकडून आता पाच हजार सातशे रुपयांची दिवाळी आली आहे. घ्या आणि मांडीआड करून खा, असे प्रा. शिंदे म्हणाले. त्यावर एकजण म्हणाला, “दिवाळी देताना कागदावर सही घेतली तर? त्यावर शिंदे म्हणाले “तुम्हाला सोडवताना मी साक्षीदार होईल,’ असे म्हणताच सभेत एकच हशा पिकला.

कर्जत  – बारामतीवाल्यांनी काटा हाणला, ओव्हरलोडचे पेमेंट थकवले. शाळा बघीतली की चॉकलेट, पॅड, खाऊ, टी-शर्ट वाटले. उद्याच्या भविष्याची ही निवडणूक आहे. मी तर नशिबवान आहे आणि माझा मतदारसंघही नशीबवान आहे. मंत्रिमंडळात माझ्यासाठी एक जागा राखीव झाली आहे. पण त्यासाठी तुम्हाला मला विधानसभेत पाठवावे लागेल, असे आवाहन प्रा. राम शिंदे यांनी केले.

कर्जत तालुक्‍यातील करमनवाडी येथे गाव भेट दौऱ्यात ते बोलत होते.शिंदे म्हणाले, पुढच्या दोन वर्षांत आपल्या हक्काच्या साखर कारखान्याचा हंगाम सुरू होईल. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना सांगेन. त्या कारखान्यात काटा मारला जाणार नाही. त्यामुळे ऊस कुठे घालायचा, अशी चिंता करू नका. यावेळी दादासाहेब सोनमाळी, राजेंद्र देशमुख, नामदेव राऊत, दादाभाऊ चितळकर यांची भाषणे झाली.

यावेळी उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, सरपंच भरत पावणे, शांतिलाल कोपनर, दादासाहेब सोनमाळी, धनराज कोपनर, राजेंद्र देशमुख, अल्लाउद्दीन काझी, दादाभाऊ चितळकर, पोपट मोरे, धनंजय मोरे, विजय पावणे, समीर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. शिंदे यांनी तालुक्‍यातील वडगाव, दूरगाव, पिंपळवाडी, तळवडी, धालवडी, बारडगाव दगडी, येसवडी, ताजू, बारडगाव सुद्रीक या गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला.

Leave A Reply

Your email address will not be published.