मुंबई : कोरोना संदर्भात थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मुंबई लोकल, मेट्रो तसेच बस सेवा बंद करण्याचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्धव ठाकरे कोरोना विषाणूसंदर्भात आढावा घेणार आहेत. यावेळी गर्दी कमी करण्यासाठी वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात होऊ शकतो अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राज्यात कोरोना बाधितांची संख्या ३९ वर पोहचली आहे. तर पुणे शहरातील हॉटेल, बार तीन दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.