#CAB : आसाममध्ये आंदोलकांवर अश्रुधूर

गुवाहाटी : एकीकडे नागरिकत्व दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. तर, दुसरीकडे देशातील अनेक ठिकाणी या विधेयकाला जोरदार विरोध होताना दिसत आहे. आसाममध्ये विधेयकावरून जोरदार विरोध पाहायला मिळत असून राज्यभरात बंद पाळण्यात आला आहे. संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणात पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

आसाममध्ये ‘नो कॅब’ हे स्लोगन रस्त्यांवर आणि भितींवर लावल्याचे पाहायला मिळत आहेत. विधेयकाविरोधात संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या असून, आसामबरोबरच लखनऊमध्येही त्याचा विरोध करण्यात आला. तसेच विधेयकाविरोधात आंदोलक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. तर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.