ईशान्य भारत कॅबमुळे धुमसतोय

गुवाहाटी : नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात विद्यार्थी आणि नानगरिक रस्त्यावर उतरल्याने इशान्य भारत बुधवारीही धुमसत राहीला. गुवाहाटीत सचिवालयाजवळ विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये धुमश्‍चक्री उडाली. आसाममध्ये आंदोलानाचा भडका उडाल्याने तेथील मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना विमानतळावर अडकून पडावे लागले. त्यांना शहरात प्रवेश करणे शक्‍य झाले नाही, असे वृत्त इस्टमोजो या संकेतस्थळाने दिले आहे. दरम्यान अरुणाचल, मणीपूर आणि मिझोराममध्ये आदोलनाने हिंसक वळण घेतले. आसाममध्ये पोलिसांच्या लाठीमारात अनेक विद्यार्थी जखमी झाले.

दिब्रुगढमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली ासून तेथे लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. आसाममध्ये अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या असून काही रेल्वेंच्या वेळापत्रकांत बदल करण्यात आला आहेत. गुवाहाटीत सचिवालयाच्या दिशेने विद्यार्थ्यांनी कुच केले. तेथे उभारलेले अडथळे त्यांनी मोडून काढले. त्यानंतर पोलिसांनी लाठमिार सुरू केला. त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. दिब्रुगढमध्येही आंदोलनाला हिंसक वळण लागले. तेथे निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. रबरी गोळ्यांचा मारा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले. कॅब रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही, अशी भूमिका निदर्शकांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली.

त्रिपुरात इंटरनेट सेवा 48 तासांसाठी बंद

त्रिपुरात बिगर आदिवासींनी बाजारपेठ उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळ निदर्शकांनी त्यांची दुकाने पेटवून दिली. अफवा पसरवू नयेत म्हणून इटरनेट सेवा दोन दिवस बंद ठेवण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. सेपाहिजला जिल्ह्यातील विश्रामगंज येथे दोन महिन्यांच्या चिमुकल्याला दवाखान्यात नेत असताना आंदोलकांनी गाडी अडवल्याने तिचा मृत्यू झाला. धलाई येथेही निदर्शनामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. पश्‍चिम त्रिपुरा आणि खोवई येथे नागरिेकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले. त्यामुळे कार्यालयातील उपस्थिती अगदी अत्यल्प होती.

अरूणाचल, मणीपूर आणि मिझोराममध्येही निदर्शने

अरुणाचलमध्ये बंद मुळे शैक्षणिक संस्था, बॅंका, व्यावसायिक अस्थापना आणि बाजारपेठा निर्मनुष्य होत्या. सतरकारी कार्यालयातही उपस्थिती शुन्यावर होती. ऑल मणीपूर स्टुडंटस असोसिएशनने पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेघालयची राजधानी शिलॉंगमध्ये निदर्शकांनी जागोजागी टायर्स पेटवून रस्ते रोखण्यात आले. मवलाई भागात पोलिसांच्या वाहनांची नासधूस करण्यात आली. काही वाहने पेटवून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.