#CAA : विरोधात विधानसभेत ठराव घेणार- पार्थ चटर्जी

नवी दिल्ली  : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात तृणमूल काँग्रेस 27 जानेवारी रोजी  विधानसभेत ठराव घेणार आहे. पश्चिम बंगालचे संसदीय कार्यमंत्री पार्थ चटर्जी यांनी मंगळवारी अशी माहिती दिली.

चॅटर्जी म्हणाले, आम्ही 20 जानेवारीला सभापतींकडे प्रस्ताव सादर केला आहे . ते 27 जानेवारीला हा प्रस्ताव विधानसभेसमोर ठेवण्यात येईल. “गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये विधानसभेने एनआरसीविरोधात ठराव मंजूर केला होता.

पश्चिम बंगालमध्ये माकप आणि कॉंग्रेसने ममता सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. या ठरावाला भाजपने “असंवैधानिक” म्हंटले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आमचे सरकार सीएए कायद्या विरोधात ठराव मंजूर करणार आहे.

आमच्या सरकारने एनपीआरविरोधात सप्टेंबरमध्ये असा ठराव मंजूर होता. नागरिकत्व कायद्या विरोधात तीन ते चर दिवसात असा ठराव संमत करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.