#CAAविरोधातील आंदोलनात सहभागी; नॉर्वेच्या महिलेला भारत सोडण्याचे आदेश

नवी दिल्ली – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील देशभरात आंदोलने होत आहेत. यामध्ये सहभागी झालेल्या एका जर्मन विद्यार्थ्याला नुकतेच देशाबाहेर घालवून देण्यात आले आहे. अशातच आणखी एका नॉर्वे महिलेला देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जेन मेट जॉनसन असे त्या नॉर्वे महिलेचे नाव आहे. जॉनसन टुरिस्ट व्हिजावर भारतात राहत होती. केरळमध्ये २३ डिसेंबर रोजी नागरिकत्व कायद्याविरोधात जॉनसन सहभागी झाली होती. यासंदर्भात ‘ब्युरो ऑफ इमिग्रेशन’ने तपास केला असून जॉनसनची चौकशी करण्यात आली आहे. यानंतर देशांतर्गत मुद्‌द्‌यांवरून निदर्शनांमध्ये भाग घेतल्यामुळे व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याने जॉनसन यांना देशाबाहेर जाण्याची सूचना करण्यात आली आहे.

दरम्यान, जर्मन विद्यार्थी जॅकोब लिंडेनथाल आयआयटी मद्रासच्या भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यार्थी आदलाबदलीच्या उपक्रमानुसार तो भारतात आला होता. मात्र नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनामध्ये भाग घेतलेल्या जर्मन विद्यार्थ्याला देशाबाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे. यावरून मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.